वृत्तसंस्था
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन आणि इटलीच्या पाच दिवासांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान ते G-20 देशांच्या शिखर संमेलनात भाग घेणार आहेत. attend important multilateral gatherings like the g20org and COP26
तसेच ग्लासगो इथं जागतिक हवामान बदलाच्या संबंधित होणाऱ्या COP26 या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी ही माहिती दिली आहे.
Over the next few days, I would be in Rome, the Vatican City and Glasgow to attend important multilateral gatherings like the @g20org and @COP26. There would also be various bilateral and community related programmes during this visit.https://t.co/0OXpm1Nhcy — Narendra Modi (@narendramodi) October 28, 2021
Over the next few days, I would be in Rome, the Vatican City and Glasgow to attend important multilateral gatherings like the @g20org and @COP26. There would also be various bilateral and community related programmes during this visit.https://t.co/0OXpm1Nhcy
— Narendra Modi (@narendramodi) October 28, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आधी सात वेळा G20 बैठकीत भाग घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान इटली देशाच्या दौऱ्यावर असतील. गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता G20 बैठक ही व्हर्च्युअल स्वरुपात आयोजित करण्यात आली होती.
G20 बैठकीच्या दरम्यान पंतप्रधान जगातल्या महत्वाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. या दरम्यान जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था रुळावर आणण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या सुधारासाठी महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी G20 हे सर्वात महत्वाचं व्यासपीठ मानलं जातं.
तसेच या दरम्यान ब्रिटनमध्ये ग्लासगो या ठिकाणी COP26 परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये वातावरण बदलाच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी, ते नियंत्रित आणण्यासाठी भारत काय प्रयत्न करतोय याची माहित पंतप्रधान देणार आहेत. या वर्षीची COP 26 ही बैठक 31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. जगभरातील 190 हून अधिक देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी हॊणार आहेत. 2015 साली पॅरिस करारामध्ये जी काही उद्देश ठेवण्यात आली आहेत त्यावर गेल्या पाच वर्षात काय कृती केली याचा आढावा घेतला जाईल. तसेच हवामान बदलाच्या संकटाला कशा पद्धतीने तोंड द्यायचं, त्यावर कोणत्या उपाययोजना करायच्या यावर जागतिक मंथन केलं जाणार आहे. क्लायमेट अॅक्शन प्लॅन कसा असावा याची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App