पेगाससद्वारे भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न – राहुल गांधी

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून देशातील मोठमोठ्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात अाले हाेते. इस्रायलच्या एनएसओ कंपनीच्या या सॉफ्टवेअरचा वापर करून भारतातील अनेकांवर हेरगिरी केल्याच्या आरोपाखालील याचिकेची सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार होती. सर्वोच्च न्यायालयाने या वेळी तीन सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी कोणतीहि तडजोड केली जाणार नाही असे न्यायालयाने यावेळी सांगितले आहे.

Attempts by Pegasus to crush Indian democracy: Rahul Gandhi

या प्रकरणामध्ये नेमके काय सत्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पेगासस हेरगिरी प्रकरणावरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे असे दिसते आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी पेगासस भारतात कोणी आणले? हा मुख्य मुद्दा उपस्थित केला.


Pegasus Scandal : पेगासस सॉफ्टवेअरच्या कथित हेरगिरीची होणार चौकशी, फ्रेंच सरकारने घेतला मोठा निर्णय


सर्वोच्च न्यायालयावर विश्वास दाखवत राहुल गांधी म्हणाले, पेगासस द्वारे भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा एक प्रकारे प्रयत्न करण्यात आला होता. संसदेच्या अधिवेशनात आम्ही पेगाससचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी आम्ही फक्त तीन प्रश्न विचारले होते. पेगासस कोणी अधिकृत केले? ते कोणाच्या विरोधात वापरले गेले? आणि इतर देशांना आपल्या लोकांची माहिती मिळाली का? मात्र यावर उत्तर मिळाले नाही. असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले आहे.

पुढे राहुल गांधी म्हणाले, या सॉफ्टवेअरचा वापर करून मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, भाजपच्या मंत्र्यांसह इतरांविरोधात ही या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला होता. पंतप्रधान आणि गृहमंत्री पेगासस वापर करून डेटा मिळवत होते का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. हे प्रकरण आम्ही संसदेत नक्कीच चर्चेत मांडू. पण भाजपला यावर चर्चा करायला अजिबात आवडणार नाही. असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला आहे.

Attempts by Pegasus to crush Indian democracy: Rahul Gandhi

 

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात