आत्मनिर्भर पॅकेजमधून शेतकऱ्यांना प्रोटिन खतांसाठी १५००० कोटींचे अनुदान, तर रोजगार योजनेची मुदतही वाढविली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजमधून शेतकऱ्यांना प्रोटिन खतांसाठी १५००० कोटी रूपयांचे अनुदान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केले. Atmanirbhar Bharat Rozgar Yojana has now been extended from June 30, 2021, to March 31, 2022

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा वित्तीय खर्च यंदा ९३८६९ कोटी रूपये असेल. आतापर्यंत या योजनेवर २ लाख २७ हजार ८४१ कोटी रूपये खर्च झाला आहे.

-आत्मनिर्भर रोजगार योजनेची मुदत वाढविली

आत्मनिर्भर रोजगार योजनेची देखील मुदत ३० जून २०२१ पासून वाढवून ती ३१ मार्च २०२२ पर्यंत करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेतून २१ लाख ४० हजार लोकांना याचा लाभ मिळाला असून ८० हजार रोजगार निर्मात्यांसाठी देखील ही योजना लाभदायक ठरली आहे.

-पर्यटन व्यवसायाला चालना

भारतात येणाऱ्या पहिल्या ५ लाख परदेशी व्यक्तींना व्हिसा शुल्क द्यावे लागणार नाही. व्हिसा देण्यास सुरुवात झाल्यानंतर ३१ मार्च २०२२ पर्यंत ही योजना लागू असेल. यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होईल. एका पर्यटकाला किंवा परदेशी व्यक्तीला एकदाच या योजनेचा फायदा घेता येईल. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर १०० कोटींचा भार पडणार आहे, असे अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले.

 

Atmanirbhar Bharat Rozgar Yojana has now been extended from June 30, 2021, to March 31, 2022

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात