विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे पूर्वेकडच्या आसाम आणि दक्षिणेतले केरळ राज्यांमध्ये लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प सुरू करण्याची महत्त्वाकांक्षा तिथल्या राज्य सरकारांनी आणि देशातल्या बड्या उद्योगपतींनी बाळगली असताना प्रगत महाराष्ट्रात मात्र जात वर्चस्वाचा राजकारणाने धुमाकूळ घातला आहे.
मध्य प्रदेश, आसाम आणि केरळ या तीन राज्यांमध्ये नुकत्याच आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदा झाल्या. या परिषदांमध्ये देशातले सगळे महत्त्वाचे उद्योगपती सहभागी झाले त्यापैकी गौतम आदानी यांच्या अदानी ग्रुपने केरळमध्ये पुढच्या ५ वर्षांमध्ये ३०००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले त्या पाठोपाठ आसाम मध्ये ५०००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे देखील स्वतः गौतम अदानी यांनी जाहीर केले. अंबानी ग्रुप ने देखील अशीच हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मनसूबा बोलून दाखविला.
वास्तविक मध्य प्रदेश आणि आसाम या दोन राज्यांमध्ये भाजपची राजवट आहे तर केरळमध्ये कम्युनिस्टांची राजवट आहे परंतु या राज्यांमध्ये कुठला भेदभाव न करता देशातल्या उद्योगपतींनी तिन्ही राज्यांमध्ये गुंतवणुकीचे प्रस्ताव दिले ते त्या राज्यांनी स्वीकारले. मध्य प्रदेश, केरळ आणि आसाम ही महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कमी प्रगत राज्य आहेत तरीदेखील तिथल्या राज्य सरकारांनी गुंतवणुकीसाठी पोषक असणारे वातावरण निर्माण करून जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुती सरकारच्या प्रगतीच्या खुणा उघड दिसत असल्या, तरी त्या विरोधात जात वर्चस्वाच्या राजकारणाने धुमाकूळ घातल्याचे चित्र समोर आले आहे. त्यातूनच छावा चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर खऱ्या – खोट्या धमक्यांचे राजकारण ऐरणीवर आणून महाराष्ट्राचे विपरीत चित्र संपूर्ण देशभर निर्माण करण्याचा “डाव” सुरू झाला आहे.
वास्तविक छावा चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे यश मिळाले. पण त्यातून आपला हेतू आणि अजेंडा साध्य होत नाही हे लक्षात येताच जुन्या जात वर्चस्वाचा राजकारणाने डोके वर काढले. छत्रपती संभाजी महाराजांवर औरंगजेबाने केलेले अनन्वित अत्याचार हा विषय मागे पडून महाराष्ट्रात गद्दारी कुणी केली??, त्यावरून जात वर्चस्ववादी राजकारणाने धुमाकूळ घातला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App