प्रतिनिधी
पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवारांचे क्रीडाप्रेम सर्वश्रूत आहे. बीसीसीआय, कुस्तिगीर परिषदेपासून ते ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदांवर त्यांनी काम केले आहे. त्याच पवारांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ व्हावे, यासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. At a time when Indian athletes are preparing for Olympics, Sharad Pawar, former IOA president
हे क्रीडा विद्यापीठ लवकरात लवकर स्थापन व्हावे. यासाठी प्रशासनाला गती देण्यासाठी पवारांसह महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या गाड्या आज चक्क बालेवाडीतल्या छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियममधल्या सिंथेटिक ट्रॅकवर धावल्या.
पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत क्रीडा विद्यापीठासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह क्रीडा मंत्री सुनील केदार, इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीसाठी आलेल्या या नेत्यांच्या गाड्या थेट क्रीडानगरीमधल्या अॅथलेटिक्सच्या सिंथेटिक ट्रॅकवरून चालवल्या गेल्या. या घटनेचे फोटो शेअर करत भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शरद पवार यांच्यासह ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर टीका केली आहे.
पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे. या विद्यापीठाच्या संदर्भात तयारीसाठी शनिवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ऑलिंपिक संघटनेचे माजी अध्यक्ष असलेल्या शरद पवारांसह क्रीडामंत्री सुनील केदार, राज्यमंत्री अदिती तटकरे आणि क्रीडा सचिव, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त उपस्थित होते. मुख्य इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील बैठक कक्षामध्ये जाण्यासाठी लिफ्ट आहेत. मात्र, तरीही गाड्या ट्रॅकवर नेण्यात आल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App