वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. सरमा या बैठकीत मणिपूरमधील परिस्थितीचा अहवाल अमित शहा यांना देतील.Assam Chief Minister will meet Union Home Minister today, report to Shah on Manipur violence
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गृहमंत्र्यांनी सरमा यांच्यावर मणिपूरमधील हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या पावलांची चौकट तयार करण्याचे काम सोपवले होते.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी 10 जून रोजी मणिपूरला भेट दिली, जिथे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली. सरमा हे उत्तर-पूर्व समन्वय परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यामुळेच त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये 3 मेपासून कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. 12 जून रोजी इंफाळमध्ये संशयित आदिवासी आणि नागरिकांमध्ये गोळीबार झाला होता. यामध्ये एका कुकीचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले. हिंसाचारामुळे राज्यातील इंटरनेट बंदी 15 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
कुकी समुदायाचे लोक मेईतेई गावांचा आणि जंगलात लपलेल्या या समुदायाच्या लोकांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत. बिष्णुपूर जिल्ह्यातील फोईगकचाओ इखाई गावात ग्रामस्थांना ड्रोन सापडल्यानंतर हा खुलासा झाला आहे. 8 जून रोजी हे ड्रोन सापडले होते. ड्रोनमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यात मोइरांग आणि परिसरातील व्हिडिओ फुटेज कैद झाले होते.
आरएएफच्या जवानांनी वाहनांच्या आणि घरांच्या काचा फोडल्या
मणिपूरमध्ये, मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा RAF कर्मचारी सिंगजामेई युम्नाम लिकाई आणि मोइरांगखोममध्ये खाजगी वाहनांच्या खिडक्या आणि निवासी घरांच्या काचा फोडताना दिसले. त्यांची ही कृती सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वृत्तानुसार त्यांनी 10 वाहनांच्या काचा आणि दोन घरांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. हे RAF जवान मंगळवारी पहाटे 2.20 च्या सुमारास सिंगाजामेईहून मोइरांगखोमच्या दिशेने जात असताना त्यांनी काचा फोडल्याचं सांगण्यात येत आहे.
हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू
मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू असलेल्या हिंसाचारात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 320 जखमी झाले असून 47 हजारांहून अधिक लोकांना 272 मदत छावण्यांमध्ये राहण्यास भाग पाडले आहे. तर 10 जून रोजी राज्यातील 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
यापूर्वी गृहमंत्री अमित शहा या महिन्याच्या सुरुवातीला येथे 4 दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान राज्याचे डीजीपी पी डोंगल यांना हटवण्यात आले. त्यांच्या जागी राजीव सिंग यांच्याकडे कमांड देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App