विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : संपूर्ण मंत्रीमंडळासोबत द काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहिल्यावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी चिंता व्यक्त केली आहे. आसाममध्ये ३५ टक्के मुस्लिम असल्याने आमचीही काश्मीरींसारखी अवस्था होण्याची भीती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Assam Chief Minister Hemant Biswa Sarma expressed concern that 35 per cent Muslims would make us like Kashmiris.
सरमा म्हणाले, आसामच्या एकूण लोकसंख्येपैकी ३५ टक्के लोकसंख्या ही मुस्लीम असल्याने त्यांना यापुढे राज्यामध्ये अल्पसंख्यांक म्हणून गृहित धरता येणार नाही. १९९० मध्ये काश्मीरमधील हिंदूंच्या ज्या हत्या झाल्या त्यासाठी मुस्लीम जबाबदार आहेत. या चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे आसामची अवस्था होईल अशी जी इतर समुदायांना भीती वाटतेय ती दूर करण्याचे मुस्लिमांचं कर्तव्य आहे.
आसामच्या विधानपरिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणारे भाषण करताना सरमा म्हणाले, आज मुस्लीम समाजातील लोक हे विरोधी पक्षाचे नेते आहेत, आमदार आहेत. त्यांना सत्तेमध्ये समान अधिकार मिळतोय.
त्यामुळेच आदिवासी लोकांच्या हक्कांचं संरक्षण होईल आणि त्यांच्या हक्कावर गदा येणार नाही याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. आदिवासींच्या सहाव्या प्रतिबंधित जमीनींवर अतिक्रमण करण्याची काहीच गरज नाहीय. जर बोरा आणि कलिता (आसामी) त्या जमिनींवर स्थायिक झालेले नाहीत तर इस्लाम आणि रहमान (मुस्लीम अडनावं) यांनी सुद्धा त्या जमिनींवर वास्तव्य करु नये.
जेव्हा आपल्याकडे सत्ता येते तेव्हा जबाबदारीही येते, असे सांगत सरमा म्हणाले, राज्यामधील लोकसंख्येच्या ३५ टक्के लोक मुस्लीम असून त्यांनी येथील अल्पसंख्यांकांच्या हितांचं रक्षण करणं हे कर्तव्य मानलं पाहिजे. आसममधील लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहे.
आपली संस्कृती आणि राहणीमानासंदभार्तील भीती त्यांना वाटतेय. सौदार्य हे दुहेरी असलं पाहिजे. मुस्लिमांनाही संस्कारी, क्षत्रिय संस्कृतीच्या संरक्षणाबद्दल बोललं तर सौदार्य टिकून राहिलं. दहा वर्षांपूर्वी आम्ही अल्पसंख्यांक नव्हतो पण आज आहोत.
काश्मीरमधून ज्या प्रकारे काश्मिरी पंडितांना त्यांची घरं सोडावी लागली त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले, जे काश्मिरी पंडितांचं झालं तेच आसाममधील लोकांबद्दल होईल का असं मला अनेकजण विचारतात. दहा वषार्नंतर आसाममध्येही अशीच परिस्थिती असेल
का जशी आता बॉलिवूडमधील द काश्मीर फाइल्समध्ये दाखवण्यात आलीय? आमची भीती घालवं हे मुस्लिमांचं कर्तव्य आहे. मुस्लिमांनी बहुसंख्यांक असल्यासारखं वागलं पाहिजे आणि आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की इथे काश्मीरची पुनरावृत्ती होणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App