विशेष प्रतिनिधी
ढाका : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी (Asian Champions Trophy hockey) स्पर्धेत भारत आज कांस्यपदकाच्या लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढत आहे.जपानविरूद्ध पराभवाचा झटका भारताला बसला .तीन वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारताचे आव्हान उपांत्यफेरीत संपुष्टात आले. बलाढ्य भारतीय हॉकी संघाला (Indian hockey team) जपानाने 5-3 ने पराभूत केले. बांगलादेशात ढाका येथे ही स्पर्धा सुरु आहे. साखळी गटात चार सामन्यात तीन विजयासह भारत अव्वल स्थानी होता. Asian Champions Trophy hockey: India lose to Japan in semifinals; The match against Pakistan starts today; India’s focus is on the bronze medal
आज तिसऱ्या स्थानासाठी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध लढत होत आहे. 2018 मध्ये भारत आणि पाकिस्तान दोघांनी संयुक्तरित्या या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. दक्षिण कोरिया विरुद्ध झालेल्या उपांत्यफेरीच्या दुसऱ्या लढतीत पाकिस्तान पराभूत झाला. रोमांचक सामन्यात दक्षिण कोरियाने पाकिस्तानला 6-5 ने पराभूत केले. जपान विरुद्धच्या सामन्यात भारताचे काही स्टार खेळाडू खेळत नव्हते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App