हॅक करा अन् 10 लाख मिळवा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे तमाम हॅकर्सना चॅलेंज, देशातील पहिले ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’ आधारित टेलिकॉम नेटवर्क सुरू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी सांगितले की, ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’वर आधारित देशातील पहिली दूरसंचार नेटवर्क लिंक आता सुरू झाली आहे. संचार भवन, नवी दिल्ली आणि CGO कॉम्प्लेक्स येथील नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) च्या कार्यालयादरम्यान ही नेटवर्क लिंक सुरू करण्यात आली आहे.Ashwini Vaishnaw invites ethical hackers to break India’s first quantum communication network

अश्विनी वैष्णव यांनी सोमवार 27 मार्च रोजी पहिल्या ‘इंटरनॅशनल क्वांटम एन्क्लेव्ह’ला संबोधित करताना ही माहिती दिली. यासोबतच दूरसंचार मंत्र्यांनी असेही जाहीर केले की, जर कोणी एथिकल हॅकर या प्रणालीमध्ये हॅक करू शकला तर त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.



वैष्णव म्हणाले की, “आम्ही एक हॅकाथॉनदेखील सुरू करत आहोत. जो कोणी ही सिस्टिम आणि सी-डॉटने बनवलेल्या सिस्टिमला हॅक करू शकेल, त्याला प्रत्येक हॅकिंगसाठी 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.”

दरम्यान, एथिकल हॅकर्स हे जबाबदार व्‍यावसायिक असतात जे चांगल्या हेतूने दोष शोधून सिस्टिम हॅक करण्‍याचा प्रयत्‍न करतात. यामुळे, कंपन्या किंवा संस्थांना त्यांच्या सिस्टिममध्ये असलेल्या त्रुटींबद्दल माहिती मिळते आणि नंतर ते त्या दूर करतात.

अश्विनी वैष्णव यांनी क्वांटम कॉम्प्युटिंग फर्म्सच्या छोट्या प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. त्यांनी या कंपन्यांना दूरसंचार नेटवर्क आणि भारतीय रेल्वेसाठी पायलट प्रोजेक्ट चालवण्यासाठी आमंत्रित केले.

Ashwini Vaishnaw invites ethical hackers to break India’s first quantum communication network

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात