वृत्तसंस्था
मुंबई – महाराष्ट्रातल्या आशा कार्यकर्त्यांनी कोविड काळात उत्तम कामगिरी केली आहे. तरीही महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने त्यांची दखल घेतलेली नाही. त्या अजूनही तुटपुंज्या मानधनावर काम करतात. ASHA workers begin statewide indefinite strike, demand fixed salary There are 70,000 ASHA workers in state
आता राज्यातल्या ७०००० आशा कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून सरकारकडे दैनंदिन ५०० रूपयांच्या कोविड भत्त्याची मागणी केली आहे. सरकार आम्हाला कोविड विरोधील लढ्यातील महत्त्वाचे योध्दा समजते पण आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते, अशी खंत आशा कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली आहे.
आशा कार्यकर्त्यांना कोविड काळात रोजचे किमान ५०० रुपये मानधन मिळावे, आरोग्य सुविधा मिळाव्यात, कोरोनामुळे आशा किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आजारी पडल्यास उपचाराचा खर्च आणि उपचार मिळावा तसेच करोनामुळे मृत्यू झाल्यास आशांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळावी, अशा मागण्या ‘महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती’ने व्यक्त केल्याचे संघटनेचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारने खरेतर यापूर्वीच स्वत:हून आशा कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेऊन काही ठोस रक्कम देणे अपेक्षित होते. पण त्याऐवजी सरकारने त्यांच्यावर संप करण्याची वेळ सरकारने आणली आहे. सरकारला अनेकदा निवेदन दिले. तसेच आम्हाला संप करायचा नाही, असेही सांगितले होते. मात्र सरकार केवळ आशा कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करून कृतज्ञता व्यक्त करणार असेल आणि काहीच देणार नसेल तर संप करणे हाच पर्याय शिल्लक राहातो, असे पाटील यांनी सांगितले.
Maharashtra | ASHA workers begin statewide indefinite strike, demand fixed salary There are 70,000 ASHA workers in state. Govt calls us the backbone but doesn't raise our pay scale. We demand the govt to increase our salaries and give us medical benefits: An ASHA worker#Mumbai pic.twitter.com/kz1groxbBg — ANI (@ANI) June 15, 2021
Maharashtra | ASHA workers begin statewide indefinite strike, demand fixed salary
There are 70,000 ASHA workers in state. Govt calls us the backbone but doesn't raise our pay scale. We demand the govt to increase our salaries and give us medical benefits: An ASHA worker#Mumbai pic.twitter.com/kz1groxbBg
— ANI (@ANI) June 15, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App