
वृत्तसंस्था
नवी दिल्ली – देशभरातील कोविड केसेसमध्ये ६८ टक्क्यांची घट आली आहे. १७ कोटी २० लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. ६६ टक्के केसेस या ५ राज्यांमधून येताहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत दिली. As per Our World in Data, the number of people who have received at least one dose of vaccine in India
याचा अर्थ कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची ही चिन्हे आहेत. उरलेल्या ४४ टक्के केसेस ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट स्थानिक पातळीवर उपाययोजना करून रोखण्याची स्थिती निर्माण झाली आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव आगरवाल यांनी सांगितले. देशाचा एकूणातला रिकव्हरी रेट ९३.१ टक्के असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
COVAXIN & Zydus vaccines already being tested in children. We will need around 25 crore doses. We will have to take this into account when we strategize. Information & analysis being continually being examined: Dr. VK Paul, Member-Health, Niti Aayog
— ANI (@ANI) June 4, 2021
देशभरात ६० टक्के ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. जगभरातील डेटाशी भारताची तुलना केली तर १७ कोटी २० लाख नागरिकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ही संख्या अमेरिकेतील सध्याच्या लसीकरणाच्या आकड्यापेक्षा मोठी आहे, अशी माहिती नीती आयोगाचे आरोग्य विषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.
कोव्हॅक्सिन आणि झायडस या लसींच्या लहान मुलांवर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचा वापर केव्हा करायचा हे ठरवावे लागेल. माहिती आणि विश्लेषणाचे काम सातत्याने सुरू आहे. आपल्याला मुलांच्या लसीकरणासाठी २५ कोटी डोसची गरज आहे. भारत बायोटेक आणि जागतिक आरोग्य संघटना यांची माहिती एकमेकांना शेअर करण्याचे काम चालू आहे. यातून लसनिर्मितीला वेग येईल, असे डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले.