विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींमध्ये नेहरू – गांधी वंशाचा अहंकार आहे, पण त्या वंशाची कुशाग्र बुद्धी आणि राजकीय प्रगल्भता नाही, हे विधान दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नसून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचे आहे.As explosive as the book – my father said Rahul Gandhi has the arrogance of nehru gandhi lineage but not their political acumen
प्रणव मुखर्जींसारख्या जागतिक कीर्तीच्या मुत्सद्याने राहुल गांधींविषयी हे मत व्यक्त केल्याने भारताच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रवण मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांची डायरी आणि संभाषणावर आधारित आठवणींचे “इन प्रणव, माय फादर : अ डॉटर रिमेंबर्स” हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकातून वर उल्लेख केलेला स्फोटक खुलासा झाला आहे.
As explosive as the book – my father said @RahulGandhi has the arrogance of nehru gandhi lineage but not their political acumen … congress claims to be liberal but they can’t tolerate anyone who has their own mind – I don’t think the leadership would accept anyone pushing them — pallavi ghosh (@_pallavighosh) December 6, 2023
As explosive as the book – my father said @RahulGandhi has the arrogance of nehru gandhi lineage but not their political acumen … congress claims to be liberal but they can’t tolerate anyone who has their own mind – I don’t think the leadership would accept anyone pushing them
— pallavi ghosh (@_pallavighosh) December 6, 2023
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यातले संबंध नेहमीच कमी अधिक प्रमाणात नरम – गरम राहिले. प्रणव मुखर्जी इंदिरा गांधींचे सर्वांत विश्वासू सहकारी होते, त्यांच्या मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री आणि भारताचे सर्वांत तरुण अर्थमंत्री होते, पण राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी मात्र त्यांच्यापासून नेहमीच विशिष्ट अंतर राखले. प्रणव मुखर्जींना पंतप्रधान व्हायचे आहे, या संशयातून राजीव गांधींनी, तर प्रणवदांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला होता, पण नंतर माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यामुळे प्रणवदांची राजकीय कारकीर्द बहरली आणि त्यानंतर राष्ट्रपतीपदावरून प्रणवदांच्या कारकिर्दीची दिमाखदार सांगता झाली. या सर्व कारकिर्दीविषयी प्रणवदांनी आपल्या डायरीत विशिष्ट नोंदी केल्या आहेत. त्या नोंदी आणि प्रणवदांशी झालेल्या संभाषणाला आधार मानून त्यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी प्रणवदांच्या आठवणी सांगणारे पुस्तक लिहिले आहे आणि त्या पुस्तकातून अतिशय धक्कादायक खुलासे बाहेर आले आहेत.
राहुल गांधींमध्ये नेहरू – गांधी वंशाचा अहंकार भरला आहे, पण त्या वंशाची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि राजकीय प्रगल्भता त्यांच्यात अजिबात नाही. काँग्रेस स्वतःला उदारमतवादी म्हणवते, पण गांधी परिवाराचे मन बिलकुल उदार नाही. ते कोणत्याही नेत्याचे स्वतंत्र मत अथवा मतभेद सहन करू शकत नाहीत. ते आपल्या खेरीज दुसऱ्या कोणत्याही नेतृत्वाला प्रोत्साहन देऊ शकत नाहीत, अशा परखड शब्दांत प्रणव मुखर्जींनी आपल्या डायरीत गांधी परिवार आणि काँग्रेसचे वाभाडे काढले, असे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पुस्तकात लिहिले आहे.
इतकेच काय पण 2004 मध्ये काँग्रेस प्रणित यूपीएचा पंतप्रधान निवडण्याची वेळ आली आणि सोनिया गांधींवर “त्याग” करण्याची वेळ आली, तेव्हा सोनिया गांधी आपल्याला पंतप्रधान करणार नाहीत डॉ. मनमोहन सिंग हे नवे पंतप्रधान असतील, असे प्रणवदांनी आपल्याला स्पष्ट सांगितले होते, असा खुलासाही शर्मिष्ठा मुखर्जींनी पुस्तकात केला आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव होणे आणि प्रणव मुखर्जींच्या डायरीवर आधारित पुस्तक प्रसिद्ध होणे हा विलक्षण राजकीय योगायोग डिसेंबर 2023 मध्ये आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App