पराभूत केजरीवालांच्या राज्यसभेतल्या एन्ट्री साठी AAP राज्यसभा खासदाराला पंजाबात लुधियाना विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे संसदीय राजकारण संपू नये यासाठी आम आदमी पार्टीने राजकीय चलाखी करत राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना राज्यसभेतून बाहेर काढून पंजाब मधल्या लुधियाना पश्चिम विधानसभा मतदार संघातल्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देऊन टाकली आहे. आम आदमी पार्टीमध्ये यावरून मोठे राजकारण रंगले आहे. Arvind Kejriwal

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. त्यांची आम आदमी पार्टी सत्तेबाहेर फेकली गेली. त्यामुळे केजरीवाल यांचे संसदीय राजकारणच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला म्हणून केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना राज्यसभेतून बाहेर काढून त्यांना पंजाब मधल्या लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत उभे केले.

त्यामुळे संजीव अरोरा यांची राज्यसभेची जागा खाली झाली. या खाली झालेल्या जागेवर पंजाब मधून अरविंद केजरीवाल यांची नियुक्ती राज्यसभेवर करण्याचा आम आदमी पार्टीचा इरादा आहे. त्यामुळे इतर प्रस्थापित राजकीय पक्षांपेक्षा आम आदमी पार्टी वेगळे राजकारण करते या राजकीय समजूतीला देखील तडा गेला आहे.

महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तातडीच्या हालचाली करून सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर पाठवणी केली. अजितदादांच्या पावलावर वेगळ्या प्रकारे पाऊल टाकून अरविंद केजरीवालांनी राज्यसभेच्या विद्यमान खासदाराला पंजाब विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देऊन “पॉलिटिकल ऍडजेस्ट” केले आणि त्याच्या जागी राज्यसभेतली स्वतःची एन्ट्री सुलभ करून घेतली.

Arvind Kejriwal to enter Rajya Sabha? BJP reacts as AAP fields Sanjeev Arora for bypoll

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात