Arvind Kejriwal …अखेर अरविंद केजरीवाल यांना आजही मिळाला नाही जामीन!

Arvind Kejriwal

सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय Arvind Kejriwal

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Arvind Kejriwal दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सीबीआय आणि केजरीवाल यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. येत्या दोन दिवसांत लेखी युक्तिवाद सादर करावा, आपण मंगळवारी भेटू असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. Arvind Kejriwal

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केजरीवाल यांच्या याचिकेवर जामीन आणि अटकेबाबत निर्णय देण्याचे संकेत दिले आहेत. याचिकेत केजरीवाल यांनी दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यात सीबीआयने केलेल्या अटकेला आव्हान दिले आहे.


Eknath Shinde : एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून ‎शेतकऱ्यांना भरपाई देणार, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा


न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुईया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. केजरीवाल यांच्या जामिनाला सीबीआयने विरोध केला आहे. केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात तपास यंत्रणेने न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. केजरीवाल यांच्या याचिकेत योग्यता नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. याचिकाकर्त्यांना या प्रकरणाला राजकीय रंग द्यायचा आहे.

23 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणात प्रति शपथपत्र दाखल करण्याची परवानगी दिली होती आणि उत्तर दाखल करण्यासाठी केजरीवाल यांना दोन दिवसांची मुदत दिली होती. केजरीवाल यांना यापूर्वीच ईडी प्रकरणात जामीन मिळाला आहे. केजरीवाल यांनी दोन याचिका दाखल केल्या आहेत. एका याचिकेत त्यांनी जामीन नाकारण्याला आव्हान दिले आहे तर दुसऱ्यामध्ये त्यांनी सीबीआयने केलेल्या अटकेला आव्हान दिले आहे. ED प्रकरणात केजरीवाल यांना 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. ईडी प्रकरणात अंतरिम जामीन मिळाल्यानंतर सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना २६ जून रोजी तिहार तुरुंगातून अटक केली.

Arvind Kejriwal has not got bail even today

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात