Arvind Kejriwal केजरीवाल यांनी रविवारी आप कार्यकर्त्यांना संबोधित करत राजीनामा जाहीर केला होता. Arvind Kejriwal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज (मंगळवार) दुपारी साडेचार वाजता उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांची भेट घेतील आणि राजीनामा सादर करतील. उपराज्यपाल कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे. यापूर्वी केजरीवाल यांनी उपराज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. Arvind Kejriwal
आम आदमी पार्टीने (आप) म्हटले आहे की, मुख्यमंत्री केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. “मुख्यमंत्र्यांनी उपराज्यपाल सक्सेना यांच्याकडे मंगळवारी बैठकीसाठी वेळ मागितला आहे. ते आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे,” असे पक्षाने सोमवारी सांगितले.
NMC portal : प्रत्येक डॉक्टरला युनिक आयडी, NMC पोर्टलवर नोंदणी अनिवार्य, देशात किती डॉक्टर्स आणि कोणती पदवी हे कळेल
केजरीवाल यांनी रविवारी आप कार्यकर्त्यांना संबोधित करत राजीनामा जाहीर केला होता. जोपर्यंत लोक त्यांना प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देत नाहीत तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असे ते म्हणाले होते. राष्ट्रीय राजधानीत लवकर निवडणुका घेण्याची मागणीही त्यांनी केली.
मंगळवारी विधीमंडळ पक्षाची बैठकही होणार आहे. तत्पूर्वी आज मनीष सिसोदिया आणि राघव चड्ढा मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App