मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच हेमंत सोरेन यांना अटक; झारखंड जमीन घोटाळ्यात 8 तास चौकशीनंतर ईडीची कारवाई

वृत्तसंस्था

रांची : जमीन घोटाळ्यात अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुमारे 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली. सोरेन यांच्या शासकीय निवासस्थानी दुपारी 1.30 वाजता चौकशी सुरू झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना संध्याकाळी 5.30 वाजता नजरकैदेत ठेवण्यात आले. ही माहिती मिळताच जेएमएम-काँग्रेस आघाडीने चंपई सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली.Arrested as soon as CM resigns; ED action after 8 hours of investigation in land scam in Jharkhand

रात्री 8:20 च्या सुमारास, चंपई तीन बसमधून आमदारांसह राजभवनात पोहोचले आणि त्यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना 43 आमदारांच्या समर्थनाचे पत्र देत सरकार स्थापन करण्याचा दावा केला. दरम्यान, हेमंत सोरेन ईडीच्या टीमसह राजभवनमध्ये पोहोचले आणि त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. तो तत्काळ स्वीकारण्यात आला.



यानंतर अटकेची पुष्टी झाली. बहुधा पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना अशा परिस्थितीत अटक झाली.मिळालेल्या माहितीनुसार, ईडी गुरुवारी सोरेन यांना कोर्टात हजर करून रिमांड मागू शकते. त्याचवेळी हेमंत सोरेन यांनी ईडीच्या समन्सविरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यावरही गुरुवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. हे प्रकरण बनावट नावे आणि पत्त्यांवर लष्कराच्या जमिनी खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. या प्रकरणी रांची महापालिकेने गुन्हा दाखल केला होता. या आधारे ईडीने तपास सुरू केला होता.

कल्पनांना विरोध, शिबूंच्या निकटवर्तीयाची निवड

हेमंत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना यांना सीएम केले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, शिबू सोरेन यांच्या स्नुषा सीता त्यांच्या विरोधात होत्या. यानंतर ‘झारखंड टायगर’ व शिबू सोरेनचे ‘हनुमान’ म्हणवले जाणारे चंपई सोरेन यांच्या नावावर सहमती झाली. चंपई मंत्री आणि ६ वेळचे आमदार आहेत. चंपई 1991 ते 2019 दरम्यान केवळ एकदा निवडणूक हरले. तथापि, रात्री उशिरापर्यंत राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले नाही.

ईडीने विचारले, जमीन कुणाची, कॅश-गाडी कुठून आली?

मुख्यमंत्री कार्यालयात ईडी पथकाने सोरेन यांना विचारले, बडगाईतील बरियातूची ८.४६ एकर जमीन कुणाची आहे व कुणाचे ताबे आहेत? मात्र, सोरेन प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. ईडीने त्यांच्या दिल्लीतील घरातून जप्त रोकड, जमिनीची कागदपत्रे व कारबाबतही प्रश्न विचारले. यावर ते म्हणाले, याबाबत मला काहीच माहीत नाही.

Arrested as soon as CM resigns; ED action after 8 hours of investigation in land scam in Jharkhand

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात