जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये भीषण रस्ता अपघात
विशेष प्रतिनिधी
जम्मू आणि काश्मीर : Jammu Kashmir येथील रामबन जिल्ह्यात रविवारी एक वाहन रस्त्यावरून घसरून ७०० फूट खोल दरीत पडल्याने (Ramban Accident) तीन लष्करी जवानांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी ११.३० वाजता अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग ४४ वर जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्याचा भाग असलेला हा ट्रक अपघातग्रस्त झाला Jammu Kashmir
माहिती देताना लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कर, पोलिस, एसडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवकांनी तात्काळ संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. मात्र या वाहनात प्रवास करणारे तीन सैनिक घटनास्थळीच मृतावस्थेत आढळले.
मृतांची ओळख शिपाई अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी झाली आहे आणि त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात ट्रकच्या ढिगाऱ्या खालून काढण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App