वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूमध्ये रविवारी लष्कराच्या जवानाच्या पत्नीसोबत विनयभंगाची घटना उघडकीस आली. या प्रकरणात, जवानाने एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये तो स्थानिक प्रशासनाकडे मदतीची याचना करत आहे. हा व्हिडिओ निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल एन. त्यागराजन यांनी पोस्ट केला आहे.Army jawan’s wife’s claim of molestation, stripping and beating in Tamil Nadu, 2 arrested
पीडित जवान हा तामिळनाडूतील पडवेडू गावचा रहिवासी आहे. हवालदार प्रभाकरन असे त्याचे नाव असून तो सध्या काश्मीरमध्ये तैनात आहे. व्हिडिओमध्ये लष्करी जवान म्हणाला, “माझी पत्नी तामिळनाडूच्या पडवेडू गावात लीजवर दुकान चालवते. काही लोक तिला बऱ्याच दिवसांपासून त्रास देत होते. गुंडांनी दुकानातील सामान बाहेर फेकले.
त्यांनी माझ्या कुटुंबावर चाकूने हल्ला केला आणि धमकी दिली. माझ्या पत्नीला अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मी एसपींना मदतीची विनंती केली आहे. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. डीजीपी सरांनाही मदत मागितली आहे.
एसपी म्हणाले- मारहाणीची बाब खोटी आहे, दोघांना अटक करण्यात आली
तिरुवन्नमलाई एसपी म्हणाले, रेणुगंबल मंदिराच्या जमिनीवर भाडेतत्त्वावर घेतलेल्या दुकानाबाबत दोन्ही बाजूंमध्ये वाद आहे. लष्करातील जवानाची पत्नी कीर्ती हिच्यासोबत मारहाणीची अशी कोणतीही घटना घडलेली नाही. प्रकरण अतिशयोक्त करण्यात आले आहे. रामू आणि हरी प्रसाद या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
लष्कर म्हणाले- सैनिकांच्या कुटुंबीयांची जबाबदारी आमची
पोलिसांच्या कारवाईदरम्यान, लष्कराने ट्विट केले की, “भारतीय सैन्य फील्ड भागात तैनात असलेल्या कुटुंबांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. हवालदार प्रभाकरनच्या बाबतीत, स्थानिक सैन्य अधिकारी पीडितेच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. कुटुंबाच्या सुरक्षेबाबत पोलिस आणि प्रशासनाशी बोलणी झाली आहेत. आम्हाला सुरक्षेचे आश्वासन मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App