Live Updates : CDS बिपिन रावत यांचे पत्नीसह हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन, १४ पैकी एकमेव ग्रुप कॅप्टन वरुण सिंह बचावले

CDS Bipin Rawat Helicopter Crash

Army helicopter crashes in Kannur Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत त्यात स्वार होते. याशिवाय इतर चार टॉप अधिकारीही त्यात होते अशी माहिती दिली जात आहे. या घटनेची अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. Army helicopter crashes in Kannur Tamil Nadu, 3 Army officers including CDS Bipin Rawat aboard chopper


वृत्तसंस्था

चेन्नई :तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी दुपारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत यांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात सीडीएस बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. तर कॅप्टन वरुण सिंग हे अपघातात एकमेव बचावले असून त्यांना वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराच्या या हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण होते. अपघातानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना अपघाताची माहिती देण्यात आली. त्याचवेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी संसदेत या अपघाताबाबत निवेदन देणार आहेत.

 

त्याचबरोबर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या घटनेविषयीचे निवेदन संसदेत आज देणार असल्याचे आधी सांगण्यात येत होते. परंतु ताज्या माहितीनुसार, ते याविषयी उद्या संसदेला माहिती देणार आहेत. सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या सीडीएस बिपिन रावत यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. अपघातानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना अपघाताची माहिती देण्यात आली. अपघातानंतर सुमारे तासाभरात अशी माहिती मिळाली की जनरल रावत यांना वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले आहे, मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. जनरल बिपिन रावत गंभीर जखमी झाल्याचा दावा काही माध्यमांत केला जात आहे. या अपघाताची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. या दुर्घटनेवर वक्तव्य देण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत पोहोचले आहेत. त्यानंतर ते कुन्नूरला रवाना होतील.

वाचा अपडेट्स…

  • संरक्षण मंत्री संसदेत देणार निवेदन
    CDS हेलिकॉप्टर अपघात प्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत निवेदन देणार आहेत. आतापर्यंत 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. लष्करही लवकरच निवेदन जारी करेल.
  • नितीन गडकरी यांचे ट्विट
    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘CODS बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरच्या दुःखद अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला. मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी प्रार्थना करतो.
  • राहुल गांधी यांनी सुरक्षेसाठी प्रार्थना केली
    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, ‘आशा आहे की सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि हेलिकॉप्टरमधील इतर सुरक्षित असतील. त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.
  • पंतप्रधानांना माहिती देण्यात आली
    मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी कॅबिनेटच्या बैठकीला उशिरा गेले. त्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली असण्याची शक्यता आहे.
  • अधिकृत निवेदन लवकरच येण्याची शक्यता
    मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतरच सीडीएस प्रकरणात अधिकृत निवेदन येण्याची अपेक्षा आहे.
  • अपघाताच्या चौकशीचे आदेश
    भारतीय वायुसेनेने ट्विट केले की, “सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह एक IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर आज तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ क्रॅश झाले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

 

दुर्घटनेनंतर सुमारे तासाभरानंतर जनरल रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असली तरी त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या दुर्घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. जनरल बिपिन रावत यांनी 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांनी 1 जानेवारी 2020 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला.

हेलिकॉप्टरमधील प्रवाशांची यादी

1. जनरल बिपिन रावत
2. मधुलिका रावत
3. ब्रिगेडियर एलएस लिडर
4. लेफ्टनंट के. हरजिंदर सिंग
5. नायक गुरसेवक सिंग
6. नायक. जितेंद्र कुमार
7. लान्स नाईक विवेक कुमार
8. लान्स नाईक बी. साई तेजा
9. हवालदार सतपाल

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हेलिकॉप्टर सुलूर एअरबेसवरून वेलिंग्टनला जात होते. घटनास्थळी डॉक्टर, लष्कराचे अधिकारी आणि कोब्रा कमांडोचे पथक उपस्थित आहे. जळालेले मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डोंगराच्या खालून आणखी काही मृतदेह दिसतात. समोर आलेल्या अपघाताच्या व्हिज्युअल्समध्ये हेलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झालेले दिसत आहे आणि त्याला आगही लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

सीडीएस बिपिन रावत, त्यांचे कर्मचारी आणि काही कुटुंबातील सदस्य एमआय-सीरिजच्या हेलिकॉप्टरमध्ये होते जे तामिळनाडूमधील कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान क्रॅश झाले. जवळपासच्या तळांवरून शोध आणि बचाव कार्य सुरू झाले आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 जण हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

स्थानिक लष्करी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि त्यांना सांगण्यात आले की, स्थानिकांनी 80 टक्के भाजलेले दोन मृतदेह स्थानिक रुग्णालयात नेले आहेत. अपघाताच्या ठिकाणी उतारावर काही मृतदेह दिसत आहेत. मृतदेह बाहेर काढण्याचे आणि ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, CDS जनरल बिपिन रावत स्वार असलेले IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर, तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ आज अपघातग्रस्त झाले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. विमान अपघाताची बातमी कळताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हळहळ व्यक्त केली. घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे.

 

टीप : हे वृत्त् सातत्याने अपडेट होत राहील… रिफ्रेश करत राहा…

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात