लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी थोपटली जवानांची पाठ, शस्त्रसंधीला १०० दिवस पूर्ण

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काश्मी्रच्या नियंत्रण रेषेलगच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू करण्याच्या कराराला शंभर दिवस पूर्ण झाले.Army Chief is in Jammu and Kashmir

यादरम्यान नरवणे यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. नरवणे यांनी सुरक्षेचा आणि कोरोना स्थितीचा आढावा घेताना जवानांची पाठ थोपटली.



परिस्थिती अशीच राहिली तर काश्मी रमधील जवानांची संख्या कमी होऊ शकते. सध्या शस्त्रसंधी सुरू आहे. परंतु ती कायम ठेवण्याची जबाबदारी पाकिस्तानवर आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रशासन, लष्कर आणि अन्य सुरक्षा संस्थांनी एकत्र काम केले आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी जवानांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

युवकांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादी गटात सामील करून घेणाऱ्या कारवायांवर लक्ष ठेवले जात असून त्यांच्या मुसक्याही आवळल्या जात आहेत. दहशतवाद्यांनी शरण येण्यासाठी लष्कराने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डीजीएमओच्या पातळीवर २५ फेब्रुवारी रोजी शस्त्रसंधीवर एकमत झाले. त्यानंतर शस्त्रसंधी लागू करण्यात आली. या कराराला शंभर दिवस पूर्ण झाले.

Army Chief is in Jammu and Kashmir

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात