मृत सापडलेला दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अलीकडच्या काळात भारताचे अनेक शत्रू संशयास्पद परिस्थितीत मरण पावले आहेत. आता बातमी आली आहे की 2018 मध्ये जम्मूमधील लष्करी छावणीवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड पीओकेमधील त्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आला आहे.Army camp attack masterminds decapitated body found in Jammu
ख्वाजा शाहिद असे मृताचे नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ख्वाजा शाहिदचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला आहे. ख्वाजा शाहिदचे काही दिवसांपूर्वी अपहरण झाले होते.
मृत सापडलेला दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर होता आणि 2018 मध्ये जम्मूच्या सुंजवान येथील लष्कराच्या छावणीवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर एके-47 रायफल आणि ग्रेनेडने हल्ला केला, ज्यात लष्कराचे सहा जवान शहीद झाले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App