तुमचा विवाह तुमच्या मैत्रिणीच्या पतीबरोबर झाला आहे का? नेटिझन्सच्या प्रश्नावर स्मृती इऱाणींनी दिले उत्तर, म्हणाल्या…

Smriti Irani new

स्मृती इराणी त्यांच्या आक्रमक आणि कायमच स्पष्टवक्तेपणा बद्दल सर्व परिचित आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  स्मृती इराणी ज्या पूर्वाश्रमीच्या टेलिव्हिजनवरील मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि विद्यमान केंद्रीयमंत्री आहेत, या कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. संसदेत असो किंवा मग सोशल प्लॅटफॉर्मवर स्मृती इराणी परखडपणे आपलं मत मांडताना दिसतात. त्यांच्याबाबतचा असाच एक प्रसंग समोर आला आहे. क्योंकी सास भी कभी बहू ती या गाजलेल्या मालिकेत तुलसी विरानी ही भूमिका साकरणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या स्मृती इराणी यांनी रविवारी इन्स्टाग्रामवर ‘Ask Me Anyting’  हे सेशन केले. यावेळी त्यांनी त्यांना विचारण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांची जे की राजकारणाच्याही पलीकडचे  होते, त्यावर अगदी स्पष्टपणे उत्तरे दिली. Are you married to your friends husband Smriti Irani replied to the question of the netizens

दरम्यान एका युजर्सने त्यांना ‘’तुमचे लग्न तुमच्या  मैत्रिणीच्या पतीशी झाले आहे का?’’ असा एक वेगळा  प्रश्न विचारण्याचे धाडस केले. हा प्रश्न त्यांना तसा अनेकदा विचारला गेला आहे, त्यामुळे त्यांनी यावर मला एकदाच आणि कायमचे उत्तर देण्यास आवडेल असे सांगितले.

त्यांनी स्पष्ट केले की, नाही, मोना या माझ्या पेक्षा १३ वर्षांनी मोठ्या आहेत. त्यामुळे त्या माझ्या लहानपणीच्या मैत्रीण आहेत, असा प्रश्नच निर्माण होत नाही. त्या माझे कुटुंब आहेत, राजकारणी नाहीत.त्यामुळे त्यांना माझ्यासोबत लढण्यासाठी, वाद घालण्यासाठी ओढू नका. माझ्यावर टीका करा पण ज्यांना याच्याशी काही देणंघेणं नाही, अशा सामान्य नागरिकांना या राजकारणात ओढू नका. त्या सन्मानास पात्र आहेत.

Are you married to your friends husband Smriti Irani replied to the question of the netizens

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*