विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपचे खासदार अनुराग ठाकूर त्यांनी राहुल गांधींना दाखवली 0 ची पाटी आणि सुप्रिया सुळे यांची देखील उडवली खिल्ली!! लोकसभेत अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या वेळी हे घडले.
अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना खासदार अनुराग ठाकूर यांनी 12 लाख रुपयांवर 0 टॅक्स अशी पाटी राहुल गांधींना दाखवली. राहुलजी ही 0 ची पाटी पाहून घ्या, असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना हाणला. पण तो सुप्रिया सुळे यांना खटकला. त्यांनी आपल्या बाकावर बसूनच अनुराग ठाकूर यांच्यावर ऑब्जेक्शन घेतले. त्यावर अनुराग ठाकूर यांनी सुप्रिया सुळे यांची देखील खिल्ली उडवली.
सुप्रियाजी, तुम्ही म्हणत असाल, तर ही 0 ची पाटी दाखवत नाही. कारण सरकारने 12 लाख रुपयांवर 0 टॅक्स केल्याचे तुम्हाला आवडलेले दिसत नाही. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. पण हरकत नाही, तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नसला, तरी देशातल्या करोडो मध्यमवर्गीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. तोच आनंद आम्हाला हवा आहे, असा टोला अनुराग ठाकूर यांनी सुप्रिया सुळे यांना हाणला.
त्यानंतर त्यांनी 0 ची आणखी स्टोरी सांगायला सुरुवात केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीकरांनी काँग्रेसला किती खासदार निवडून दिले??, 2015 च्या विधानसभा निवडणुकीत किती आमदार निवडून दिले??, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत किती खासदार निवडून दिले??, 2020 च्या विधानसभा निवडणुकीत किती आमदार निवडून दिले??,
2024 च्या लोकसभा निवडणुकीत किती खासदार निवडून दिले??, 2025 च्या विधानसभा निवडणुकीत किती आमदार निवडून दिले?? अशा एकापाठोपाठ एक सवालांच्या फेरी अनुराग ठाकूर यांनी झाडल्या त्यावर भाजपच्या बाकावरून प्रत्येक वेळी मोठ्याने 0 असा आवाज आला. भाजपच्या सगळ्या खासदारांनी काँग्रेसची 0 आमदार + खासदार निवडून आणल्याबद्दल खिल्ली उडवली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App