विरोधक जेव्हा एखाद्याचे वाईट चिंततात तेव्हा त्याचे चांगलेच होते, असेही मोदींनी म्हटले.
विशेष प्रतनिधी
नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मागील दोन दिवस यावरून संसदेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला, विरोधकांनी सरकारवर प्रचंड टीका केली सत्ताधारी खासदारांनीही त्याला उत्तर दिले, अखेर आज पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. Answering the motion of no confidence Prime Minister Modi strongly criticized the opposition party
केंद्र सरकारच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले की, “नियोजन आणि कठोर परिश्रम सुरूच राहतील. गरजेनुसार नवीन सुधारणा केल्या जातील आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्व प्रयत्न केले जातील. आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. 2028 मध्ये तुम्ही(विरोधक) अविश्वास प्रस्ताव आणाल तेव्हा देश जगातील पहिल्या तीन देशांमध्ये असेल, असा विश्वास देशाला आहे.’’
विरोधकांवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, “अविश्वास आणि गर्व त्यांच्या(विरोधकांच्या) नसनसांमध्ये आहे…” आपल्या सरकारविरोधातील अविश्वास ठरावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाच वर्षांनंतर विरोधक पुन्हा प्रयत्न करतील, असे भाकीत केले. यासह, भारत तेव्हा जगातील तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल यावर त्यांनी भर दिला.
लोकसभेला संबोधित करताना, मोदींनी 2018 मध्ये त्यांच्या सरकारच्या विरोधात आणलेल्या पहिल्या अविश्वास प्रस्तावाची आठवण करून दिली आणि 2023 मध्ये विरोधक त्याची पुनरावृत्ती करतील अशी त्यांची टिप्पणी पुन्हा केली. विरोधी पक्षांना एक ‘वरदान’ असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. “त्यांच्याकडे एक गुप्त वरदान आहे. जेव्हा ते एखाद्याचे वाईट करू इच्छिता तेव्हा त्याचे चांगलेच होते. असेच एक उदाहरण तुमच्यासमोर उभे आहे. वीस वर्षे उलटली, फक्त माझे चांगलेच झाले आहे.”
LIVE: PM Shri @narendramodi's reply to the No-Confidence Motion in Lok Sabha. https://t.co/koiLHm2qLg — BJP (@BJP4India) August 10, 2023
LIVE: PM Shri @narendramodi's reply to the No-Confidence Motion in Lok Sabha. https://t.co/koiLHm2qLg
— BJP (@BJP4India) August 10, 2023
तसेच, मोदी म्हणाले, “ते (विरोधक) जर एखाद्या संस्थेच्या विरोधात बोलतात, तर त्या संस्थेचे नशीब पालटते. 1991 मध्ये देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता. पण 2014 नंतर भारताने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले.” असेही मोदींनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App