वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेरिकेतील नोवोवॅक्स (Novavax) कंपनी आणि सीरम इन्स्टिट्यूट यांनी तयार केलेल्या SII Novavax या कोरोनावरील नव्या लशीच्या चाचणीचे परिणाम सकारात्मक आले आहेत.Another new vaccine developed from serum; The company claims to be 90 percent effective
भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस दिली जाते आहे. आता सीरमने अमेरिकेतील नोवोवॅक्स कंपनीच्या मदतीने SII novavax ही लस तयार केली आहे. ती भारतात दिली जाणार आहे
SII novavax म्हणजेच NVX-CoV2373 कोरोना लस. 29,960 लोकांवर या लशीची चाचणी घेण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम जाहीर केले आहेत. या लशीचा एकूण प्रभाव 90.4 टक्के आहे. तर मध्यम आणि तीव्र आजारापासून संरक्षण देण्यात ही लस 100 टक्के प्रभावी आहे.
नोवाव्हॅक्सने सांगितलं, यूएस आणि मेक्सिकोमध्ये या लशीची चाचणी घेण्यात आली. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सपासून ही लस सुरक्षा देते. सर्वात जास्त प्रभावी आहे. प्राथमिक अहवालानुसार ही लस सुरक्षित आहे आणि जवळपास 90% प्रभावी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App