नाशिक : पाकिस्तानात इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. भारताकडून मार खाल्लेला लष्कर प्रमुख सत्तेवर कब्जा करून बसतोय. कारगिल युद्धात भारताकडून मार खाल्लेला लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ याने नवाज शरीफ सरकार बरखास्त करून पाकिस्तानातली सत्ता काबीज केली होती. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता असून ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताकडून मार खाल्लेला पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर सत्तेवर कब्जा करायच्या बेतात आलाय.Asim munir
पाकिस्तानात मुलकी म्हणजे नागरी सरकार आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातले मतभेद वाढले असून पाकिस्तानी मुलकी सरकारचा झुकाव चीनकडे, तर पाकिस्तानी लष्कराचा झुकाव अमेरिकेकडे झाल्याने या मतभेदांना जास्त गंभीर स्वरूप आलेय.
ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताकडून मार खाल्लेला जनरल असीम मुनीर अमेरिकेत पोहोचला त्याने डोनाल्ड ट्रम्प यांचे diplomatic lunch खाल्ले. त्यामुळे त्याचे बळ वाढले असून त्याची पावले पाकिस्तानची सत्ता कब्जा करण्याच्या दिशेने पडू लागलीत. तो लवकरच पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना बाजूला करून त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसण्याची शक्यता पाकिस्तानातूनच व्यक्त करण्यात येत आहे.
त्याचबरोबर पाकिस्तानची राज्यघटना बदलून असीम मुनीर याच्या लष्कर प्रमुख पदाबरोबरच राष्ट्राध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रक्रियेत पंतप्रधान शहाबाज शरीफ याने त्याला साथ दिली, तर ठीक अन्यथा त्यालाही बाजूला करायच्या हालचाली पाकिस्तानात सुरू असल्याचे बोलले जात आहे.
– पाकिस्तानी लष्कराचा कल अमेरिकेकडे
भारताविरुद्धच्या संघर्षात चिनी लष्करी सामान बोगस आणि बनावट ठरले. चिनी विमाने आणि मिसाईल्स ढपली. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर अमेरिकेकडे झुकले. असीम मुनीर आणि पाकिस्तानचा हवाई प्रमुख बाबर यांनी एकापाठोपाठ एक अमेरिकेचे दौरे केले. त्यांनी अमेरिकेकडून विमानांचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी डॉलर्स मिळण्याचे आश्वासन घेतले. त्याबरोबरच पाकिस्तानी लष्कराला आणखी काही आधुनिक सामग्री मिळण्याचे मान्य करून घेतले. त्यामुळे पाकिस्तानात लष्करी राजवटीचा पोलादी पंजा अधिक घट्ट होण्याची शक्यता असून चीनकडे झुकलेले सगळेच नेते सत्तेवरून दूर फेकले जाण्याची चिन्हे दिसू लागलीत.
– बिलावल भुट्टो झुकल्याचे निमित्त
त्यातच भारताने सिंधू जल वाटप करार स्थगित ठेवल्यानंतर पाकिस्तानची तहान वाढली असून ती भागवण्यासाठी पाकिस्तानातले नागरी सरकार भारताला हवे असलेले दहशतवादी हाफिज सईद आणि मौलाना मसूद अझर यांना भारताच्या ताब्यात द्यायला तयार झाले. बिलावल भुट्टोने तसे वक्तव्य केले. त्याबरोबर पाकिस्तानातले लष्कर आणि इमरान खानचा पक्ष तहरिक ए इन्साफ यांनी भुट्टो आणि पाकिस्तानी सरकार विरुद्ध आगपाखड चालवली. आसिफ अली झरदारीला अध्यक्षपदावरून दूर करायची तयारी चालू झाली.
– पाकिस्तानातील खाणींवरून अमेरिका – चीन संघर्ष
या सगळ्यातून पाकिस्तान पुन्हा एकदा लष्करी राजवटीच्या पंजाखाली आणायची तयारी समोर आली. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा आणि असीम मुनीर याचा मुलगा यांच्यातल्या आर्थिक व्यवहारांची गुप्त माहिती देखील उघड्यावर आली. बलुचिस्तान मधल्या खाणींवर अमेरिकेच्या अधिकाराला असीम मुनीरने मान्यता दिली. त्यामुळे अमेरिकन ट्रम्प प्रशासनाने देखील मुनीरच्या पारड्यात वजन टाकल्याचे उघड झाले. पाकिस्तानातल्या नागरी सरकार मधल्या नेत्यांनी बलुचिस्तान मधल्या खाणी चिन्यांना दिल्या. पण आता तिथे अमेरिकेने शिरकाव केला आणि त्याला असीम मुनीर कारणीभूत ठरला म्हणून पाकिस्तानात लष्करी बंड करून त्याचा सत्ता काबीज करायचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App