आणखी एक मेड इन इंडिया कोरोना लस, केंद्र सरकार देणार दीड हजार कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हॉन्स, पंतप्रधानांनी जुलै महिन्यातच कंपनीला दिली होती १०० कोटी रुपयांची मदत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची साथ सुरू झाल्यापासूनच विविध फार्मा कंपन्यांशी सातत्याने चर्चा सुरू केली होती. काही कंपन्यांना आर्थिक मदतही केंद्र सरकारने दिलीहोती. या प्रयत्नांना फळ आले असून बायोलॉजीकल ई या कंपनीची कोरोना प्रतिबंधक लस तिसºया टप्यात आहे. केंद्र सरकारने या लसीचे ३० कोटी डोस आगाऊ बुक केलेअसून त्यासाठी दीड हजार कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्सही देण्यात येणार आहे. Another made-in-India corona vaccine, an advance of Rs 1,500 crore from the central government, the prime minister had given Rs 100 crore to the company in July


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची साथ सुरू झाल्यापासूनच विविध फार्मा कंपन्यांशी सातत्याने चर्चा सुरू केली होती. काही कंपन्यांना आर्थिक मदतही केंद्र सरकारने दिली होती.

या प्रयत्नांना फळ आले असून बायोलॉजीकल ई या कंपनीची कोरोना प्रतिबंधक लस तिसºया टप्यात आहे. केंद्र सरकारने या लसीचे ३० कोटी डोस आगाऊ बुक केलेअसून त्यासाठी दीड हजार कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्सही देण्यात येणार आहे.



मेड इन इंडिया कोरोना प्रतिबंधक लस असलेल्या ‘बायोलॉजिकल ई’ या कंपनीच्या ३० कोटी डोसची आगाऊ खरेदी केंद्र सरकारकडून केली जाणार आहे. यासाठी ‘बायोलॉजिकल ई’ या कंपनीला १५०० कोटी रुपये आगाऊ देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची साथ सुरू झाल्यापासूनच फार्मा कंपन्यांशी सातत्याने बैठका घेतल्या होत्या. त्याच वेळी अनेक कंपन्यांना मदत केली होती.

बायोलॉजीकल ई या कंपनीला ‘बायोटेक्नॉलॉजी विभागा’कडून १०० कोटींहून अधिक रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याचाच परिणाम म्हणून आता आणखी एक स्वदेशी लस तयार होण्याच्या अंतिम टप्यात आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, लसीचे हे सर्व डोस आॅगस्ट ते डिसेंबर २०२१ दरम्यान साठवले जाणार आहेत. हैदराबाद स्थित लस निर्मात्या ‘बायोलॉजिकल ई’ या

कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षणात चांगले परिणाम पाहायला मिळाले. या लशीची तिसºयाटप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.

‘बायोलॉजिकल ई’च्या लस निर्मिता प्रक्रियेदरम्यान प्री-क्लिनिकल स्टेजपासून ते फेज ३ पर्यंतच्या अभ्यासात भारत सरकारने मदत केली आहे. यासाठी ‘बायोटेक्नॉलॉजी विभागा’कडून १०० कोटींहून अधिक आर्थित मदत उभी केली.

‘बायोलॉजिकल ई’द्वारे निर्माण करण्यात येत असलेली ही लस एक आरबीडी प्रोटीन सब-युनिट लस आहे. येत्या काही महिन्यांत ही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

आगाऊ लस उत्पादनाचा प्रस्ताव लस पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नॅशनल एक्सपर्ट ग्रुपनेही पडताळून पाहिले आहे. कंपनीला २४ एप्रिल रोजी फेज ३ ट्रायलसाठी परवानगी मिळाली होती.

नोव्हेंबर २०२० मध्ये या लसीची पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील चाचणीची सुरूवात झाली होती. ‘फेज ३ ट्रायल’मध्ये देशातील १५ निरनिराळ्या ठिकाणांवर १२६८ उमेदवार सहभागी होणार आहेत.

Another made-in-India corona vaccine, an advance of Rs 1,500 crore from the central government, the prime minister had given Rs 100 crore to the company in July

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात