एलिना सालडाणा यांनी गोवा विधानसभा अध्यक्षांकडे सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचवेळी भाजपचं सदस्यत्वही त्यांनी सोडलं आहे. Another blow to BJP in Goa; MLA Elena Saldana resigns
विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीआधी मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत असून आतापर्यंत विविध पक्षांच्या ५ आमदारांनी राजीनामे दिले आहेत.दरम्यान सेक्स स्कॅंडलप्रकरणी आरोप झाल्यामुळे भाजप आमदार आणि मंत्री मिलिंद नाईक यांना बुधवारी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला .दरम्यान लगेचच आज गोव्यात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.कारण आमदार एलिना सालडाणा यांनी तडकाफडकी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून पक्षालाही रामराम ठोकला आहे.
एलिना सालडाणा यांनी गोवा विधानसभा अध्यक्षांकडे सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचवेळी भाजपचं सदस्यत्वही त्यांनी सोडलं आहे. राजीनामा देताना एलिना यांनी पक्षात अनागोंदी माजल्याचे सांगत गंभीर आरोप केले आहेत.एलिना या आम आदमी पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे.
एलिना सालडाणा यांनी गोवा मंत्रिमंडळात पर्यावरण राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. ६९ वर्षीय एलिना सालडाणा या पती माथानी सालडाणा यांच्या निधनानंतर राजकारणात उतरल्या होत्या. माथानी सालडाणा हे मनोहर पर्रिकर सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या. त्यांचे २०१२ मध्ये निधन झाल्याने पोटनिवडणूक झाली आणि त्यात एलिना या भाजपच्या तिकिटावर कोर्टोलिम मतदारसंघातून निवडून आल्या. त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा एकदा भाजपकडून त्यांना संधी दिली गेली व त्या दुस-यांदा आमदार बनल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App