या दुर्घटनेत दहा जण जखमीही झाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील विवेक विहार बेबी केअर सेंटरमध्ये मोठी दुर्घटना होऊन काही तासही उलटले नाहीत, तोच राजधानीच्या आणखी एका भागात भीषण आग लागली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.Another big accident in the capital Building fire three dead
राजधानीच्या कृष्णा नगरमध्ये एका घराला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. चार मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींना लागलेली आग इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पसरली आणि त्यानंतर संपूर्ण घराला आग लागली.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा छछी बिल्डिंग, गल्ली क्रमांक एक, बँक ऑफ इंडियाजवळ, कृष्णा नगर येथे झाला. आग इतकी भीषण होती की लोक आरडाओरडा करू लागले. इमारतीतून आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट उठत असल्याचे पाहून संपूर्ण परिसरात घबराट पसरली आणि लोक घाबरले.
या अपघातात भाजल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App