वृत्तसंस्था
बेंगलोर : बजरंग दलावरील बंदीचा मुद्दा पेटून तो काँग्रेसवरच उलटणार असल्याचे पाहून काँग्रेसने हौदाने गेलेली अब्रू बूंदने आणायचा प्रयत्न चालवला आहे. काँग्रेसने राज्यभरात हनुमान मंदिरे बांधण्याची घोषणा केली आहे. Announcement of construction of temples all over Karnataka : congress
कर्नाटकात भाजप सरकारवर 40% कमिशनचा आरोप करून सरकारविरुद्ध जोरदार वातावरण तापविले असताना त्याचा फायदा मिळवण्याऐवजी काँग्रेसने भलताच मार्गावर अवलंबत बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले. हा मुद्दा पूर्णपणे मिस्ड फायर झाला आणि तो काँग्रेसवरच उलटला. कर्नाटकात भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांचे कार्यकर्ते पेटून उठले. त्यांनी ठिकठिकाणी काँग्रेसचे जाहीरनामे जळले. कर्नाटकचे माजी गृहमंत्री ईश्वर आप्पा मोर्चामध्ये सामील झाले त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जाळला त्यानंतर अनेक ठिकाणी तसेच प्रकार घडले. अनेक गावे शहरांमध्ये काँग्रेसचा निषेध करणारे मोर्चे निघाले. लाखो कार्यकर्त्यांनी हजारो मठ मंदिरांमध्ये हनुमान चालीसाचे पठण केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील एका ओळीने बजरंग दल संघटनेला राजकीय संजीवन दिले.
त्यामुळे काँग्रेसला अक्षरशः वठणीवर यावे लागले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय कायदेमंत्री आणि माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांना देखील काँग्रेसचे कान टोचावे लागले. राज्य सरकार कुठल्याही संघटनेवर बंदी घालू शकत नाही, याची कायदामंत्री म्हणून मला माहिती आहे, अशा शब्दात वीरप्पा मोईली यांनी आपल्याच पक्षाच्या जाहीरनाम्याचे वाभाडे काढले. केंद्रीय मंत्री शोभा करंदलजे यांच्या नेतृत्वाखाली मल्लेश्वर मंदिरात हजारो कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाचे पठण केले. आजही घराघरात कर्नाटकात घराघरांमध्ये आणि मठ मंदिरांमध्ये हनुमान चालीसाचे पठण जोरदार सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी म्हैसूर मध्ये चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर त्यांनी अंजनेय मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले. तेथूनच त्यांनी कर्नाटक राज्यात ठिक ठिकाणी मोठी हनुमान मंदिरे बांधण्याचा संकल्प केला आणि जुन्या हनुमान हनुमान मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याची घोषणा केली. बजरंग दलाच्या मुद्द्यावर बंदीच्या मुद्द्यावर काँग्रेसला अशी हापटी खावी लागली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App