कैलाशविजयवर्गीय, तरुण चुघ, अरुण सिंग यांना पुन्हा संधी मिळाली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली टीम जाहीर केली आहे. नड्डा यांनी शनिवारी (२९ जुलै) पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. नड्डा यांच्या टीममध्ये नव्या-जुन्या चेहऱ्यांचा ताळमेळ बसवण्यात आला आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रातून तीन जणांना या नव्या कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. यामध्ये विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी फेरनिवड करण्यात आली असून, राजस्थानच्या सहप्रभारी विजयाताई रहाटकर आणि पंकजा मुंडे यांचीही सचिवपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. Announcement of BJP national office bearers 13 vice presidents and 8 general secretaries
उत्तर प्रदेशचे दोन खासदार रेखा वर्मा, लक्ष्मीकांत बाजपेयी आणि विधान परिषद सदस्य तारिक मन्सूर यांना केंद्रीय उपाध्यक्षांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. तसेच, झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनाही केंद्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे.
संजय बंदी आणि सुनील बन्सल यांना राष्ट्रीय महामंत्री करण्यात आले आहे. संजय बंदी यांचा केंद्रीय कार्यकारिणीत समावेश करून पक्षाने तेलंगणाला संदेश दिला आहे. कैलाशविजयवर्गीय, तरुण चुघ, विनोद तावडे, अरुण सिंग यांना पुन्हा संधी मिळाली आहे. या सर्वांना पुन्हा सरचिटणीस बनवण्यात आले आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने निम्नलिखित केंद्रीय पदाधिकारियों के नामों की घोषणा की है- pic.twitter.com/0aaArxHF30 — BJP (@BJP4India) July 29, 2023
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने निम्नलिखित केंद्रीय पदाधिकारियों के नामों की घोषणा की है- pic.twitter.com/0aaArxHF30
— BJP (@BJP4India) July 29, 2023
काँग्रेसचे दिग्गज नेते एके अँटनी यांचे पुत्र अरुण अँटनी यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अँटनी यांनी काही काळापूर्वी पक्षात प्रवेश केला होता. गोरखपूरचे माजी आमदार राधामोहन अग्रवाल यांना केंद्रीय संघात प्रवेश देऊन यूपीच्या राजकारणात मोठा संदेश गेला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात आले नव्हते, मात्र आता त्यांना राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशचे प्रभारी सुनील देवधर यांना राष्ट्रीय संघातून वगळण्यात आले. सीटी रवी आणि दिलीप सैकिया यांनाही सरचिटणीस पदावरून हटवण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे खासदार आणि माजी सहकोषाध्यक्ष यांना हटवण्यात आले. त्यांच्या जागी नरेश बन्सल यांना सहकोषाध्यक्ष करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App