गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी केली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने CRPFचे महासंचालक अनिश दयाल सिंह यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. नलिन प्रभातच्या जागी अनिश दयाल सिंह त्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. दयाल हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. याआधी अनिश दयाल सिंह हे आयटीबीपीचे महासंचालक होते.
एनएसजीचे महासंचालक नलिन प्रभात यांना जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष महासंचालक बनवण्यात आले आहे. गुरुवारी गृह मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केला.
Narendra Modi : विकसित भारताचा संकल्प ते वैद्यकीय शिक्षणाच्या वाढीव 75000 जागा; लाल किल्ल्यावरून काय म्हणाले मोदी??; वाचा!!
फक्त एक दिवस आधी, त्यांना NSG च्या महासंचालक पदावरून मुक्त करण्यात आले आणि AGMUT (अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश) कॅडरमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले.
जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष महासंचालक म्हणून त्यांचा कार्यभार ३० सप्टेंबरपर्यंत राहील. विद्यमान पोलीस महासंचालक आर.आर.स्वेन ३० सप्टेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर ते १ ऑक्टोबरपासून राज्य पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App