‘राहुल गांधी राष्ट्रीय नेत्यासारखे नाही तर…’, अनिल अँटनी यांनी काँग्रेस नेत्यांवर सोडले टीकास्त्र!

भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेसविरोधात उघडली आघाडी .

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता अनिल अँटनी यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल अँटोनी यांनी ट्विट केले की, “राहुल गांधी – एका राष्ट्रीय पक्षाचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे तथाकथित पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला पाहून दु:ख होते, की ते एक ऑनलाइन/सोशल मीडिया सेल ट्रोलसारखे बोलत आहेत, राष्ट्रीय नेत्यासारखे नाही.” Anil Antony criticized Congress leader Rahul Gandhi

ते पुढे म्हणाले की, “राष्ट्र उभारणीच्या कार्यात अनेक दशके योगदान देणाऱ्या मोठ्या दिग्गजांसह आपले नाव पाहून खूप आनंद झाला, कारण त्यांनी कुटुंबासाठी नव्हे तर भारत आणि आपल्या लोकांसाठी काम करणे पसंत केले म्हणून त्यांना पक्ष सोडावा लागला.

एक फोटो ट्विट करताना राहुल गांधींनी लिहिले होते की, “सत्य लपवतात, म्हणूनच दररोज भटकवतात, प्रश्न तोच आहे – अदानींच्या कंपन्यांमध्ये 20,000 कोटी बेनामी रक्कम कुणाची आहे?” या फोटोमध्ये भाजप नेत्यांच्या नावांसोबत अदानी लिहिले होते.

काँग्रेसविरोधात आघाडी उघडली –

माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेसविरोधात आघाडी उघडली आहे. काँग्रेसवर परिवारवादाचा आरोप करत ते म्हणाले होते की, त्यांचा धर्म देशासाठी काम करणे आहे, कुटुंबासाठी काम करणे नाही. आजकाल काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कुटुंबासाठी काम करणे हाच आपला धर्म वाटतो. मात्र राष्ट्रासाठी काम करणे हाच माझा धर्म आहे.

Anil Antony criticized Congress leader Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात