फुटबॉलर लिओनेल मेस्सीला कोलकत्यात आणायचा सगळा डाव उधळला; ममतांना मागावी लागली माफी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी वेगवेगळे हातखंडे आजमावून मतदारांना आकर्षित करण्याचा ममता बॅनर्जी यांनी डाव खेळला खरा, पण पहिल्या झटक्यातच त्यांच्या हा डाव उधळला गेला. फुटबॉलर लिओनेल मेस्सीला कोलकत्यात आणून त्याच्याबरोबर मोठा इव्हेंट करायचे सगळे डाव उधळले गेले आणि उलट ममता बॅनर्जी यांनाच मेस्सी आणि फुटबॉल प्रेमींची माफी मागावी लागली.

जागतिक पातळीवरचा लोकप्रिय फुटबॉलर लिओनेल मेस्सी GOAT दौऱ्यावर भारतात आला. त्याने आधी कोलकत्याला भेट दिली. नंतर हैदराबाद मध्ये त्याचा दौरा ठरला. आज कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये तो आला. त्याच्या आधी पश्चिम बंगाल मधल्या सगळ्या फुटबॉल प्रेमींनी स्टेडियमवर तुफान गर्दी केली होती.

मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी हजारो तरुण उतावळे झाले होते. तो स्टेडियम मध्ये आला, त्यावेळी त्याच्या जवळ जाण्यासाठी प्रचंड गोंधळ उडाला. आयोजकांना उत्साही तरुणांना आवरून धरताच आले नाही. स्टेडियम मध्ये प्रचंड धक्काबुक्की झाली. मारामारी झाली. स्टेडियम मधला हा गोंधळ पाहून लिओनेल मेस्सी स्टेडियम मधून लवकर हॉटेलकडे निघून गेला. त्यामुळे फुटबॉल प्रेमी आणखी चिडले. त्यांनी स्टेडियम मध्ये धुमाकूळ घातला. तिथल्या खुर्च्यांची आणि सामानाची मोडतोड केली.

– ममतांचा आधी संताप, नंतर माफी

याच दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्टेडियम कडे यायलाच निघाल्या होत्या. परंतु अर्ध्या वाटेतच त्यांना स्टेडियम मधल्या गोंधळाची माहिती समजली. मेस्सी तिथून निघून गेल्याचे समजले. त्यामुळे ममतांचा पापड मोडला. त्या प्रचंड संतापल्या. त्यांनी या सगळ्या गोंधळाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्याचवेळी त्यांनी मेस्सी आणि फुटबॉल प्रेमींची माफी मागितली. प्रचंड मोठा इव्हेंट करून तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा डाव उधळला गेला. त्यामुळे संतापून त्यांनी आयोजकांवर आगपाखड केली.

Angry fans today vandalised the Salt Lake Stadium in Kolkata, alleging poor management of the event.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात