भटक्याचे आयुष्य दिल्यामुळे देवावरचा राग काढण्यासाठी मंदिरावर दगडफेक करणाऱ्या ला पोलीसांनी अटक केली. दिल्लीतीतल पंजाबी बाग येथील मंदिरावर एका तरुणाने दगडफेक केली होती. Anger at God for giving life to a wanderer, stone throwing at a temple, youth arrested in Delhi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भटक्याचे आयुष्य दिल्यामुळे देवावरचा राग काढण्यासाठी मंदिरावर दगडफेक करणाऱ्याला पोलीसांनी अटक केली. दिल्लीतीतल पंजाबी बाग येथील मंदिरावर एका तरुणाने दगडफेक केली होती.
विकी माल असे या तरुणाचे नाव आहे. पंजाब बाग येथील वैैष्णोमाता मंदिरातील महादेवाच्या दोन मूर्तींची तोडफोड झाल्याचे पुजारी रणजित पाठक यांना शनिवारी सकाळी समजले. तोडफोड केलेल्या मूर्तींजवळ दगड आणि विटांचे तुकडे सापडले होते. पाठक यांनी या घटनेची माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी तातडीने तपास केला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी रस्त्यावरील कचरा उचलणाऱ्या विकी माल याने केल्याचे उघड झाले.
लॉकडाऊनच्या पूर्वी विकी हा त्याच्या वडीलांसोबत काम करत होता. मात्र, लॉकडाऊन लागल्यावर त्याचे वडील मुळ गावी बिहारमधील मोतीहारी येथे निघून गेले. त्यानंतर विकी अस्वस्थ होता. आपल्याला भटक्याचे आयुष्य दिल्याबद्दल त्याचा देवावर राग होता. त्यातूनच त्याने शुक्रवारी रात्री वष्ैणोमाता मंदिरातील महादेवाच्या मूर्तींची तोडफोड केली. पोलीसांनी या प्रकरणी विकीवर गुन्हा दाखल केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App