आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी आहेत देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; जाणून घ्या सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री कोण?

Jaganmohan Reddy

देशभरातील मुख्यमंत्र्यांची संपत्तीसह यादी आली आहे समोर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने विश्‍लेषित केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे ५१० कोटींच्या एकूण संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. ADR अहवालात असे म्हटले आहे की, सध्याच्या ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ हे करोडपती आहेत, केवळ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची संपत्ती १५ लाख रुपये आहे. Andhra Pradesh chief minister Jaganmohan Reddy is the wealthiest chief minister of the country

ADR ने सांगितले की, विश्लेषण केलेल्या ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ (९७ टक्के) कोट्यधीश आहेत आणि प्रत्येक मुख्यमंत्र्यांची सरासरी ३३.९६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ADR अहवालानुसार, ३० पैकी १३ (४३ टक्के) मुख्यमंत्र्यांवर खून, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि गुन्हेगारी धमकी यांसंबंधी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मालमत्तेच्या बाबतीत अव्वल तीन मुख्यमंत्र्यांमध्ये आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी (५१० कोटींहून अधिक), अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू (१६३ कोटींहून अधिक) आणि ओडिशाचे नवीन पटनायक (६३ कोटींहून अधिक) या तिघांचा समावेश आहे.

याशिवाय ADR ने माहिती दिली की, कमी घोषित संपत्ती असलेल्या तीन मुख्यमंत्र्‍यांमध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी (१५ लाखांपेक्षा जास्त), केरळचे पिनाराई विजयन (१ कोटींहून अधिक) आणि हरियाणाचे मनोहर लाल (१ कोटींहून अधिक) यांचा समावेश आहे.

Andhra Pradesh chief minister Jaganmohan Reddy is the wealthiest chief minister of the country

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात