विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीच्या तोंडावर गेल्या दोन-तीन दिवसातल्या राजकीय घडामोडी नीट पाहिल्या तर “उद्धव ठाकरे एकाकी उद्योगपती साथीशी”, या शीर्षकाचा प्रत्यय येतो. Anant Ambani meet Uddhav and Aditya Thackeray at matoshree
रमा एकादशी + वसुबारस या दिवशी शिवतीर्थावर मनसेच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले. त्याच्या आदल्यास दिवशी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले. मुंबईतच घडलेल्या या राजकीय घटनांमध्ये घटनांमधून नेमकेपणाने बोलायचे झाले, तर उद्धव ठाकरे यांचे नाव बाजूला होते. एक प्रकारे उद्धव ठाकरे या सर्व घडामोडींमध्ये एकाकी पडलेत.
पण काल मनसेच्या दीपोत्सवाच्या व्यासपीठावर जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्याबरोबर एकत्र होते, तेव्हाच ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर गेले होते. ते तब्बल तीन तास मातोश्रीवर होते आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याशी ते बोलत होते. ठाकरे पिता पुत्र आणि अनंत अंबानी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली??, अनंत अंबानी हे कोणाचा निरोप पोहोचवायला मातोश्रीवर गेले होते??
अँटीलियासमोर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाचा या भेटीशी काही संबंध होता का??, याचे तपशील अधिकृतरित्या बाहेर आलेले नाहीत. पण मनसेचा दीपोत्सव शिवतीर्थावर सुरू असतानाच अनंत अंबानींचे मातोश्रीवर जाणे याचीच मोठी बातमी झाली आणि एकीकडे राजकारण्यांचा जमावडा आपण वगळून महाराष्ट्रात होत असताना आपल्या साथीशी उद्योगपती आहे हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले.
त्याच्या आधी काही दिवसांपूर्वीच गौतम अदानी हे देखील उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर पोहोचले होते. त्या भेटीचे तपशील देखील बाहेर आलेले नाहीत. पण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार झाल्यानंतर राजकीय दृष्ट्या जेव्हा एकाकी पडले आहेत आणि शिवसेनेतली फाटा फूट सावरण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा अदानी आणि अंबानी हे दोन उद्योगपती त्यांना मातोश्रीवर येऊन भेटणे याला वेगळे महत्त्व आहे.
आता या दोन उद्योगपतींमध्ये आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेमके काय चर्चा झाली याचे तपशील जरी बाहेर आले नसले तरी मुंबई ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या राजकीय परफॉर्मन्स मध्ये या भेटींचे प्रतिबिंब कसे पडेल?? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा परफॉर्मन्स कसा उंचावेल??, हे पाहणे रंजक ठरणार आहे. तूर्त उद्धव ठाकरे एकाकी, उद्योगपती साथीशी!! हे शीर्षक मात्र रेलेव्हंट ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App