सेंगोल प्रकरणात “खरा ट्विस्ट”; वाचा प्रख्यात कायदेतज्ञ महेश जेठमलनींचे ट्विट!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताच्या नव्या संसदेत उद्या प्रतिष्ठित होत असलेल्या सेंगोल अर्थात राजदंड या विषयावर काँग्रेसने तो राजदंडच नव्हे, तर ती नेहरूंची वॉकिंग स्टिक होती, असा दावा केला. तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने तो राजेशाहीचे आणि सरंजामशाहीचे प्रतीक मानला. पण आता या चोल राजेवंशीय सेंगोलला काँग्रेसने नेहरूंची वॉकिंग स्टिक का म्हटले आहे?, याचे “रहस्य” उघडकीस आले आहे. ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि सुप्रीम कोर्टातले प्रख्यात वकील महेश जेठमलानी यांनी त्यावर एका ट्विटद्वारे प्रकाश टाकला आहे.Anand Bhavan the Nehru family home in which the Sengol was displayed before its recovery



या ट्विटमध्ये महेश जेठमलनी म्हणतात :

आनंद भवन हे नेहरू कौटुंबिक घर आता जवाहरलाल नेहरू मेमोरियल ट्रस्टच्या मालकीचे आहे. त्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. या घरातच सेंगोल ठेवले होते. या घराचा सुमारे साडेचार कोटींचा मालमत्ता कर नेहरू मेमोरियल ट्रस्टने थकविला आहे. अलाहाबाद नगरपालिका आणि आताची प्रयागराज नगरपालिका यांचा हा 4.35 कोटी रुपयांच्या मालमत्ता कर थकीत आहे.

नेहरू मेमोरियल ट्रस्टने आनंद भवनाचा वापर वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याने मालमत्ता कराची मागणी होती असे दिसते!

पण सेंगोल प्रकरणातील ट्विस्ट येथे आहे :

आनंद भवनातील सेंगोलच्या प्रदर्शनातील शिलालेखात सेंगोलचे वर्णन माउंटबॅटनकडून नेहरूंना “भेट” असे केले आहे. सत्ता हस्तांतराचे प्रतीक म्हणून सेंगोलची भाजपने रचलेली कथा खोटी आहे, असे काँग्रेस विशेषत: माझे बोलघेवडे मित्र जयराम रमेश म्हणत आहेत. पण त्यांची “वेदनाच” यातून उघड होत आहे. हा सेंगोल नेहरूंना मिळालेली “भेट” आहे, असे दाखवून काँग्रेस भारताच्या सार्वभौमत्वाच्या अमूल्य प्रतिकाचा उघड गैरवापर केल्याच्या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे. सेंगोल प्रकरणात काँग्रेसच्या या बचावाचे हे प्रमुख कारण आहे, असे मला वाटते. त्यामुळे सेंगोल ही नेहरू कुटुंबाची मालमत्ता बनते. म्हणूनच ही मालमत्ता आनंद भवनात प्रदर्शित करण्यात आली जी “नेहरू स्मारकासाठी” संग्रहालय म्हणून घोषित केली गेली आहे. लक्षात ठेवा, आनंद भवनची मालकी असलेली JNMT ही गांधी कुटुंबाच्या नियंत्रणाखालील एक खाजगी ट्रस्ट आहे. भारतीय संपत्तीची नेहमीची कौटुंबिक लालसा?

महेश जेठमलनी यांनी यातून 3 कायदेशीर मुद्दे उपस्थित केले आहेत.

1. आनंद भवन आता सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालचे खासगी ट्रस्ट आहे.

2. त्यांनी वास्तूचा व्यावसायिक वापर करूनही 4.35 कोटी रूपये मालमत्ता करत थकविला आहे

3. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्तेच्या हस्तांतराचे सार्वभौम प्रतीक असलेला सेंगोल त्यांनी नेहरूंची गोल्डन वॉकिंग स्टिक “खासगी भेट” म्हणून प्रदर्शित केला होता.

याचा अर्थ हा विषय इथेच थांबणार नाही. त्यातील कायदेशीर बाबींच्या गुंतागुंती अधिक वाढत जाणार आहेत. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील जवाहरलाल नेहरू मेमोरियल ट्रस्टला त्याची कायदेशीर उत्तरे द्यावी लागणार आहेत.

Anand Bhavan the Nehru family home in which the Sengol was displayed before its recovery

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात