अयोध्यातला श्री रामलल्लांची मूर्ती आसनावर विराजमान; पहिली झलक समोर!!

विशेष प्रतिनिधी

अयोध्या : अयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी १६ जानेवारीपासून विधी सुरु झाला आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिरात गुरुवारी रामलल्लांची मूर्ती आणण्यात आली. या मूर्तीची पहिली झलक प्रथमच समोर आली आहे. गर्भगृहातील आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.An idol of Sri Ramlalla seated on a seat in Ayodhya; First look ahead!!



रामलल्लांची मूर्ती साधारण 5 वर्षांच्या बालकरुपातील असून ती कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिळेत घडविली आहे. मूर्ती आता झाकून ठेवलेली आहे.

गर्भगृहातील पहिला फोटो

गुरुवारी रामलल्ला गर्भगृहात विराजमान झाले. यावेळी विविध प्रकारचे संस्कार आणि पूजन करण्यात आले. प्राणप्रतिष्ठेसाठी काशी मधून आलेल्या पुरोहितांनी विधी विधान केले. हा कार्यक्रम संपल्यानंतर गुरुवारी रात्री रामलल्लांच्या मूर्तीचा गर्भगृहातील पहिला फोटो समोर आला. या फोटोमध्ये राम मंदिराचे बांधकाम करणारे कामगार हात जोडून रामलल्लांना नमस्कार करताना दिसत आहेत.

3.4 फूट उंच रामलल्लांचे आसन

रामलल्लांचे आसन 3.4 फूट उंच आहे. क्रेनच्या मदतीने रामलल्लांची मूर्ती राम मंदिर परिसरात आणली गेली. त्याचे काही फोटो समोर आले होते. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी त्याचे आसनही तयार केले गेले. रामलल्लांची मूर्ती आसनावर प्रतिष्ठापणा करण्यापूर्वी 4 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. मंत्रोच्चारात पूजन विधी करुन रामलल्लांना आसनावर विराजमान करण्यात आले. आता 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

An idol of Sri Ramlalla seated on a seat in Ayodhya; First look ahead!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात