ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह अक्षरशा ओढत नेत अन्य घुसखोर पळून गेले. An attempt to infiltrate Akhnoor failed Jawans killed one terrorist infiltrator
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : अखनूरच्या आयबी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. काल रात्री चार दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. सतर्क सुरक्षा दलांना संशयास्पद हालचाली दिसल्या आणि त्यांनी गोळीबार केला.
या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला आहे. तर तिघे आल्या पावली परत पळाले आहेत. तिन्ही दहशतवाद्यांनी ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह ओढत पळ काढला.
पूंछ-राजोरी सेक्टरमध्ये 25 ते 30 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय असल्याचा संशय आहे. या सेक्टरमध्ये पसरलेल्या घनदाट जंगले आणि नैसर्गिक गुहांना दहशतवादी आपले अड्डे बनवत असल्याचे मानले जात आहे.
2020 मध्ये, चीनबरोबर बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारताने राष्ट्रीय रायफल्सच्या तुकड्या पुंछ सेक्टरमधून काढून टाकल्या होत्या आणि त्यांना लडाखमध्ये हलवले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App