विशेष प्रतिनिधी
राजौरी : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. राजौरी येथे लष्कराच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पोलिसांनी मोठी कारवाई केली असून याप्रकरणी चार स्थानिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.Major action in Poonch terror attack Four locals detained investigation underway
ताब्यात घेतलेल्या लोकांची पोलीस चौकशी करत आहेत. काही स्थानिक लोकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. गुरुवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला, ज्यामध्ये पाच जवान शहीद झाले आणि दोन जण जखमी झाले.
यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी या भागातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, काही स्थानिक लोकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा पोलिस आणि तपास यंत्रणांना संशय आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App