वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जनावरांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘पेटा’ या गैर सरकारी जागतिक संघटनेवर देशात बंदी घालण्याची मागणी अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी ‘अमूल’ चे उपाध्यक्ष वालमजी हुंबाल यांनी पंतप्रधानांकडे केली. भारतीय दुग्ध क्षेत्राची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न ‘पेटा’ने केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. Amul vice-chairman urges PM to Ban PETA In India
दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या ‘अमूल’वर जनावरांच्या हक्कांसाठी काम करणार्या पीपल्स फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ़ अॅनिमल्स (पेटा ) या जागतिक स्वयंसेवी संस्थेने आरोप केले आहेत. त्यात अमूल कंपनी आपल्या दाबदब्याचा वापर करून वनस्पती-आधारित दूध व अन्न पदार्थांच्या बाजाराचे शोषण करत असल्याचे म्हंटले आहे. या बाबीला अमूलचे उपाध्यक्ष वलमजी हुंबाल यांनी आक्षेप घेतला असून ‘पेटा’वर बंदी घालण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. भारतीय दुग्ध क्षेत्राची प्रतिमा कलंकित करून 10 कोटी लोकांचे जीवनमान उध्वस्त करण्याचा प्रयत्न ‘पेटा’कडून केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
जीडीपीमध्ये दुग्ध क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान
भारताच्या जीडीपीमध्ये दुग्ध क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. परंतु या स्वयंसेवी संस्थांसारख्या संधीसाधू घटकांनी केलेल्या चुकीच्या आरोपामुळे जीडीपीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासारख्या संघटना भारतीय दूध उत्पादकांना बेरोजगार करण्याचे षडयंत्र रचत आहेत, असे हंबाळ यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकात सांगितले.
कृत्रिम दूध उत्पादाना प्रोत्साहन नको
दुग्ध उद्योगाच्या प्रतिमेला कलंक लावण्याच्या निंदनीय कृत्यात गुंतलेल्या पेटा सारख्या संस्थांवर बंदी घालण्यासाठी आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी अमूलने दूध उत्पादकांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच कृत्रिम दूध उत्पादित करणार्या मल्टीनेशन कंपन्यांना देशात प्रोत्साहन देऊ नये, असे आव्हान केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App