बरगड्यांना मार लागल्याने शूटींग अर्धवट सोडून मुंबईत परतलेल्या अमिताभ बच्चन यांनी दुखपतीबाबत स्वत: दिली आहे माहिती.
विशेष प्रतिनिधी
Amitabh Bachchan Gets Injured: बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांना हैदराबादमध्ये दुखापत झाली आहे. हैदराबादमध्ये चित्रपटाची शुटींग दरम्यान ही घटना घडली आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. आपला आगामी चित्रपट ‘प्रोजेक्टे के’साठी मारहाणीच्या प्रसंगाची शूटींग सुरू असताना अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली. त्यानंतर ते हैदराबादेतून मुंबईत आपल्या घरी परतले आहेत. Amitabh Bachchan injured during the Project K shooting of an action scene accident on the set in Hyderabad
या संदर्भात माहिती देताना अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले की, हैदारबादेत प्रोजेक्ट के च्या शूटींग दरम्यान एका मारहाणीच्या प्रसंगात मला दुखापत झाली. बरगडीला मार लागला आहे, उजव्या बरगडीची मांसपेशी फाटली आहे. शूटींग रद्द केले आहे. एआयजी रुग्णालयात स्कॅन केले आणि हैदराबादेतून घरी परतलो आहे. पट्टी बांधली आहे आणि उपचार सुरू आहेत. दुखावत आहे, हालचाल करण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. ठीक होण्यास काही आठवडे लागतील. वेदना कमी व्हाव्यात म्हणून औषध घेणे सुरू आहे.
”…त्यामुळे मला वाटत नाही अशाप्रकारे पत्र लिहून यातून कोणाची सुटका होईल’’ विरोधकांनी मोदींना पाठवलेल्या पत्रावर फडणवीसांचं विधान!
याशिवाय अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, ‘’दुखापतीमुळे सर्व कामं थांबवली आहेत. जोपर्यंत संपूर्ण उपचार होत नाही, तोपर्यंत सर्व काम बंद असतील. सध्या मी जलसा येथे आराम करत आहे. आवश्यक कामकाजासाठी जरावेळ मोबाईलवर आहे, बाकीवेळ आराम सुरू आहे. सांगण्यास वाईट वाटते परंतु आज संध्याकाळी मी जलसाच्या गेटवर चाहत्यांना भेटू शकणार नाही. तरी कृपया कोणी येऊ नये आणि जे कोणी येणार असतील त्यांनाही कळवावे, बाकी सर्व ठीक आहे.’’ असंही अमिताभ बच्चन यांनी सांगितलं आहे.
"In Hyderabad at shoot for Project K, during an action shot, got injured, rib cartilage popped broke & muscle tear to the right rib cage. Cancelled shoot, did doctor consult & scan by CT at AIG Hospital in Hyderabad & flown back home," posts Amitabh Bachchan. (pic 2: file pic) pic.twitter.com/BqHu6yKirL — ANI (@ANI) March 6, 2023
"In Hyderabad at shoot for Project K, during an action shot, got injured, rib cartilage popped broke & muscle tear to the right rib cage. Cancelled shoot, did doctor consult & scan by CT at AIG Hospital in Hyderabad & flown back home," posts Amitabh Bachchan.
(pic 2: file pic) pic.twitter.com/BqHu6yKirL
— ANI (@ANI) March 6, 2023
अभिनेता प्रभास प्रमुख भूमिकेत असलेल्या प्रोजेक्ट के या चित्रपटत अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिपिका पदुकोनही दिसणार आहे. ही चित्रपट १२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत. हा चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात मोठा चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App