मणिपूरवर चर्चेसाठी विरोधकांचे सहकार्य मागण्यासाठी अमित शाहांचे मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरींना पत्र!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : मणिपूर मधील हिंसाचार आणि तिथल्या परिस्थितीवर संसदेत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सहकार्य मागणारे पत्र लिहिले आहे. मणिपूर मधल्या सर्व राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. यासाठी सर्व विरोधकांचे सरकारला सहकार्य हवे आहे. ते आपण करावे, अशी विनंती अमित शाह यांनी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना केली आहे.Amit Shah’s letter to Mallikarjun Kharge, Adhir Ranjan Chowdhury seeking opposition’s support for discussion on Manipur



हिंसाचार ग्रस्त मणिपूरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख देखील अमित शाह यांनी या पत्रात केला आहे. त्याचबरोबर मणिपूरशी संबंधित सर्व विषयांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी दर्शविली आहे.

मणिपूरच्या मुद्द्यावर गेला आठवडाभर सर्व विरोधक संसदेचे कामकाज रोखून धरत आहेत. सरकारची चर्चेची तयारी असताना देखील संसदेत गदारोळ घालत आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी दोन्ही सदनाच्या विरोधी पक्ष नेत्यांना लिहिलेले पत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. या पत्राला दोन्ही विरोधी पक्ष नेते कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अमित शहा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ही दोन्ही पत्रे शेअर केली आहेत.

Amit Shah’s letter to Mallikarjun Kharge Adhir Ranjan Chowdhury seeking opposition’s support for discussion on Manipur

महत्वाच्या बातम्या 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात