अमित शहा यांचा मोठा खुलासा : यूपीएच्या सत्ताकाळात सीबीआयने माझ्यावर दबाव आणला, मोदींना अडकवण्याचा होता प्रयत्न

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमधील कथित बनावट चकमक प्रकरणात अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता.Amit Shah’s big revelation CBI pressured me during UPA rule, trying to implicate Modi

नरेंद्र मोदी सरकार त्यांना (विरोधकांना) लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत असल्याच्या विरोधकांच्या आरोपावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शहा यांनी एका मीडिया ग्रुपच्या कार्यक्रमात हे सांगितले.

गृहमंत्री म्हणाले, सत्तेच्या गैरवापराचा मी बळी आहे. माझ्यावर खोट्या चकमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोदींचे नाव घेण्यासाठी दबाव निर्माण करण्यात आला. 90 टक्के प्रश्नांमध्ये मोदींचे नाव घेतले तर सोडू, असे म्हटले होते. एका राज्याने मोदींविरोधात एसआयटी स्थापन केली, पण आम्ही कधीच डळमळलो नाही.



मला दंगलीत अडकवण्याचा प्रयत्न झाला, गुन्हा दाखल झाला

शहा म्हणाले, मला दंगलीत अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. दंगलीत सामील झाल्याची प्रकरणे समोर आली, पण काहीही निष्पन्न झाले नाही. आम्ही कोणतेही काळे कपडे घालून निषेध केला नाही. हे प्रकरण मुंबई न्यायालयात नेले. तेथे न्यायालयाने हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले. काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे.

अध्यादेश मदत करू शकत होता

गृहमंत्री म्हणाले की, राहुल गांधींनीच पूर्वीच्या यूपीए सरकारच्या काळात अध्यादेश फाडला होता ज्यामुळे आता त्यांची मदत होऊ शकली असती. न्यायालयाकडून दोषी ठरलेल्या कोणालाही संसदेचे किंवा विधानसभेचे सदस्यत्व गमवावे लागते, हा देशाचा कायदा आहे. काँग्रेसमध्ये अनेक मोठे वकील आहेत आणि त्यांच्यापैकी काही राज्यसभेचे सदस्यही आहेत, त्यांनी गांधींना कायदेशीर मुद्द्यांवर सल्ला द्यावा.

सदस्यत्व गमावणारे राहुल हे पहिले नेते नाहीत

राहुल गांधींना सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्याबद्दल शहा म्हणाले की, न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर संसदेचे सदस्यत्व गमावणारे राहुल गांधी हे पहिले नेते नाहीत. शिक्षेला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात जावे, असे ते म्हणाले, परंतु ते आपल्या नशिबासाठी पंतप्रधान मोदींना दोष देत आहेत. शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दोषारोप करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी राहुल गांधींनी स्वतःच्या आरोपाविरुद्ध लढण्यासाठी उच्च न्यायालयात जावे.

शहा पुढे म्हणाले की, त्यांनी शिक्षेला स्थगिती देण्यासाठी अपील केलेले नाही. हा कसला अहंकार? तुम्हाला सहनुभूती हवी आहे. तुम्हाला खासदार राहायचे आहे आणि कोर्टातही जाणार नाही?

अनेक नेत्यांचे सदस्यत्व गेले

गृहमंत्री म्हणाले, सदस्यत्व गमावल्याबद्दल ओरड करण्यासारखे काही नाही. याआधीही अनेक बड्या आणि अनुभवी नेत्यांचे सदस्यत्व गेले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्यासह 17 नेत्यांना ते एका किंवा दुसर्‍या विधानसभा किंवा संसदेचे सदस्य असताना दोषी ठरविण्यात आले होते. यूपीएच्या काळात 2013 मध्ये बनवलेल्या कायद्यानुसार या लोकांना शिक्षा झाल्याबरोबर त्यांचे सदस्यत्व गमावले. या लोकांनी देशाच्या कायद्याचे पालन केले आणि त्यांच्यापैकी कोणीही काळे कपडे घालून विरोध केला नाही.

लालूंना अपात्र ठरवल्यावर लोकशाही धोक्यात आली नव्हती, पण गांधी घराण्यातील सदस्याला अपात्र ठरवताच लोकशाही धोक्यात आल्याचे ते म्हणत आहेत. गांधी घराण्यासाठी वेगळा कायदा असावा असे लोक म्हणत आहेत. तुम्ही राहुल यांचे पूर्ण भाषण ऐका, असे सांगत शहा म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींना तर शिव्या दिल्याच पण मोदी समाज आणि ओबीसी समाजालाही शिव्या दिल्या. त्यांनी मुद्दाम असे भाषण केले. राहुल यांनी याबाबत माफी मागितली नाही, तर जामिनासाठी अर्जही करू नये. ते म्हणाले की, देशाचा कायदा स्पष्ट आहे. यात सूडाचे राजकारण नाही. त्यांच्याच सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे.

शहा यांचा राहुल यांना सल्ला

शहा म्हणाले की, हा देशाचा कायदा आहे की ज्याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे त्याचे संसद किंवा विधानसभेचे सदस्यत्व गमावले जाते. शहा म्हणाले की, काँग्रेसकडे अनेक मोठे वकील आहेत आणि त्यापैकी काही राज्यसभा सदस्यही आहेत. राहुल यांनी त्यांना कायदेशीर समस्यांबाबत सल्ला द्यावा. राहुल यांना त्यांचे अधिकृत निवासस्थान ताबडतोब रिकामे करण्याच्या नोटीसबद्दल विचारले असता, शहा म्हणाले की ही घाई नाही, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

Amit Shah’s big revelation CBI pressured me during UPA rule, trying to implicate Modi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात