नाशिक : अमित शाहांनी गोळी मारली होती लखनऊ, पण ती जाऊन लागली पाटण्यात!!, अशीच राजकीय घडामोडी आज पाटण्यातून समोर आली. Amit Shah
– अखिलेश यादवांचा अमित शाहांना टोला
Waqf सुधारणा कायद्यावर लोकसभेत चर्चा सुरू असताना अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर डिवचले होते. तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष दूर करण्यासाठी Waqf संशोधन बिल आणले आहे, पण तुम्हाला तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष अजून निवडता येत नाही. तो निवडा. वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा आणि मग Waqf संशोधन बिल आणा, असा टोमणा अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना लगावला होता.
– अमित शाहांचे प्रत्युत्तर
पण त्यावर प्रत्युत्तर देताना अमित शाह यांनी अखिलेश यादव यांच्या दिशेने जोरदार बाण सोडला होता. आत्ता लोकसभेत समोर बसलेल्या सगळ्या पक्षांचे पुढचे अध्यक्ष मी सांगू शकतो. कारण तुम्हाला तुमच्या परिवारातल्या पाच – सहा सदस्यांमधूनच एक अध्यक्ष निवडायचा असतो. त्यामुळे मी आत्ता सांगतो, अखिलेशजी, तुम्ही पुढच्या 25 वर्षांसाठी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष होऊन जा!! पण आमच्याकडे तसं नाही. 12 – 13 करोड सदस्य आहेत, त्यातून पक्षाचा अध्यक्ष निवडायचा असतो. त्यासाठी मोठी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेसाठी वेळ लागतो. आमच्याकडे कोण अध्यक्ष होईल हे मी नाही सांगू शकत. भाजपचे सदस्य पक्षाचा अध्यक्ष ठरवतात. कारण आमच्या पक्षात खरी लोकशाही आहे आणि म्हणून आमचा पक्ष वाढतो. आम्ही लोकांशी संपर्क ठेवतो, असा टोला अमित शाह यांनी अखिलेश यादव यांना हाणला होता.
– लालू आणि तेजस्वी यादव
पण अमित शाह यांनी दीड वर्षांपूर्वी अखिलेश यादव यांना हाणलेला हा टोला आज बिहारच्या पाटण्यात जाऊन लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना बरोबर लागला.
– लालूप्रसाद यादवांची चूक
कारण अमित शाह म्हणाले, त्याप्रमाणेच लालूप्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांना राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकारी अध्यक्ष नेमून घराणेशाही पुढे रेटण्याची मोठी राजकीय चूक केली. बिहार विधानसभा निवडणुकीत दणकून पराभव झाल्यानंतर सुद्धा लालूंनी तेजस्वी यादव यांना राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची “बक्षीसी” दिली. लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाचा फक्त बिहारमध्ये पराभव होऊन थांबला नाही. त्यापलीकडे जाऊन त्यांचे कुटुंब सुद्धा तुटले. लालूंची मुले तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव, मिसा भारती, रोहिणी आचार्य यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला गेली. ते एकमेकांचे कट्टर वैरी बनले. पण या सगळ्या राजकारणातून लालूप्रसाद यादव यांनी धडा शिकला नाही. त्यांनी स्वतःच्या घराबाहेरच्या नेत्याकडे राष्ट्रीय जनता दलाची सूत्रे दिली नाहीत. त्यांनी पक्षांमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही राबवलीच नाही. पक्षाची सूत्रे नवीन तरुण रक्ताकडे देण्याच्या ऐवजी त्यांनी ती घरातच दिली. ज्याच्यामुळे घरातच भांडणे लागली, त्या तेजस्वी यादव यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केले.
अमित शाह यांनी अखिलेश यादव यांना मारलेली राजकीय गोळी लालूप्रसाद यादव यांच्या घराण्याला बरोबर जाऊन लागली. जी राजकीय चूक करायला नको होती, तीच लालूप्रसाद यादव यांनी केली. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना लालूप्रसाद यादव यांच्यासकट सगळ्या राष्ट्रीय जनता दलाची अब्रू बिहारच्या आणि भारताच्या विषयावर टांगण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली.
– भाजपचे राजकीय प्रयोग
भाजपने बिहार मधल्या एका दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्याला राष्ट्रीय अध्यक्ष केले. नितीन नवीन राष्ट्रीय अध्यक्ष करणे हा मोठा राजकीय प्रयोगच आहे. भाजपचे नेते असे राजकीय प्रयोग करू शकतात. ते यशस्वी होतात किंवा अयशस्वी होतात, पण म्हणून ते प्रयोग करायचे थांबत नाहीत. पण घराणेशाहीतले पक्ष असले प्रयोग करायचे धाडस दाखवूच शकत नाहीत, हे आजच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा समोर आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App