Amit Shah : तुकडे तुकडे गॅंग बरोबर राहण्याची राहुल गांधींना जुनी खोड; अमित शाहांचा हल्लाबोल

Amit shah target Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात हिंदूंमध्ये फूट पाडण्याच्या हेतूने जातिगत जनगणनेचा मुद्दा लावून धरणाऱ्या राहुल गांधींनी अमेरिकेत गेल्याबरोबर आपला सूर बदलत भारतातले आरक्षण संपविण्याची भाषा केली. काँग्रेसचा वर्चस्ववादी भेसूर चेहरा त्यामुळे सगळ्या जगासमोर आला. भाजपला आणि बाकीच्या काँग्रेस विरोधकांना त्या पक्षाला ठोकून काढण्याची चांगली संधी मिळाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट लिहून राहुल गांधींच्या दुटप्पी भूमिकेचे वाभाडे काढले. Amit shah target Rahul Gandhi

राहुल गांधी यांनी थेट अमेरिकेतील वॉशिंग्टन मधल्या जॉर्ज टाउन विद्यापीठात आरक्षणावर आपली भूमिका मांडली. योग्य वेळ आल्यावर काँग्रेस आरक्षण संपविण्याबद्दल विचार करेल. जेव्हा देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींच्या या विधानावरुन देशभरात पडसाद उमटले.

त्यावरूनच अमित शहा यांनी राहुल गांधींना टार्गेट केले. देशाच्या विरोधात बोलणे आणि तुकडे तुकडे गॅंग बरोबर उभे राहणे ही राहुल गांधी आणि काँग्रेसची जुनी खोड म्हणजे सवय आहे. मग ते जम्मू काश्मीरमध्ये जेएनकेसीच्या देशविरोधी आणि आरक्षण विरोधी अजेंड्याचे समर्थन करणे असो, वा परदेशातील व्यासपीठांवर भारताविरोधात बोलणे. राहुल गांधींनी नेहमी भारताच्या सुरक्षेला आणि भावनांना ठेच पोहोचवली आहे, असे टीकास्त्र अमित शाह यांनी सोडले.

– भाजप असेपर्यंत आरक्षण कायम

भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये आणि धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण करण्याबद्दल बोलणे, यातून राहुल गांधी यांचे फूट पाडण्याचेच विचार दिसतात.राहुल गांधींनी देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणण्याचे काम केले आहे. मनातील गोष्टी आणि विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात, पण मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत भाजप आहे, आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही आणि देशाच्या एकतेसोबत छेडछाड करु शकत नाही, असेही अमित शाह यांनी सुनावले.

– राहुल गांधींचे घुमजाव!!

मात्र, देशातील आरक्षण संपविण्याविषयी राहुल गांधींच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठविल्यावर राहुल गांधी यांनी घुमजाव केले. आमचा आरक्षणाला विरोध नाही. काँग्रेस पक्षाने कायमच पाठिंबा दिला आहे. 50 % पुढे आरक्षण घेऊन जाण्याचा आमचा हेतू आहे, असं राहुल गांधी म्हणाले. यात त्यांनी त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण दिलं आहे. काल मी जे बोललो ते चुकीच्या प्रकारे पसरवले जात आहे. माझा आरक्षणाला विरोध असल्याचे पसरवले जात आहे. पण मी आरक्षणाच्या विरोधात नाहीये. तर मी आरक्षणाच्या बाजूने आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Amit shah target Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात