केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांनी समाजवादी पार्टीच्या एबीसीडीचा अर्थ सांगताना जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, समाजवादी पार्टीसाठी ए म्हणजे अपराध-आतंक, बी म्हणजे भाई-भतीजावाद, सी- करप्शन आणि डी म्हणजे दंगा. Amit Shah said Samajwadi Party’s ABCD means, A means crime terror, B-nepotism, C-corruption and D means riot
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांनी समाजवादी पार्टीच्या एबीसीडीचा अर्थ सांगताना जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, समाजवादी पार्टीसाठी ए म्हणजे अपराध-आतंक, बी म्हणजे भाई-भतीजावाद, सी- करप्शन आणि डी म्हणजे दंगा.
हरदोई येथे पक्षाच्या जनविश्वास यात्रे अंतर्गत आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना शहा म्हणाले, समाजवादी पाटीर्ची एबीसीडी उलटी आहे. ही संपूर्ण एबीसीडी फोडण्याचे काम भाजपाने केले आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने छापा टाकला तेव्हा अखिलेशच्या पोटात दुखणे सुरू झाले होते, म्हणू लागले की राजकीय द्वेषातून छापा टाकला आणि आज त्यांना काय बोलावं हेच कळत नाही.
कारण समाजवादी अत्तर बनवणाऱ्याच्या घरी छापेमारीत अडीचशे कोटी रुपये सापडले आहेत. कोणी अडीचशे कोटी रुपये पाहिले आहेत का? हे उत्तर प्रदेशच्या जनतेचे लुटलेले अडीचशे कोटी अंतरवाल्याच्या घरातून निघाले आहेत. अखिलेश यादव तुम्ही आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, मोदींनी सत्तेत येण्यापूर्वीच सांगितले होते की भाजपा या देशातून भ्रष्टाचार नष्ट करेल, काळा पैसा संपवेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात ३०० पेक्षा अधिक जागांसह भाजपाचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे, असा दावा करत शाह यांनी सपासह बहुजन समाज पार्टीवर हल्ला चढवला. २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये भाजपाने विजय मिळवला आहे, तर आता २०२२ मध्ये भाजपा सलग चौथ्या विजयाने सपा-बसपाचा धुव्वा उडवेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App