Amit Shah : ‘पाकिस्तान दहशतवाद्यांवरचा हल्ला स्वतःवरचा हल्ला मानतो’

Amit Shah

अमित शहांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा पर्दाफाश केला


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Amit Shah नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. ते म्हणाले की भारताने फक्त पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर लक्ष केंद्रित केले.Amit Shah

तसेच, केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले, “आपल्या पंतप्रधानांची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, आपल्या गुप्तचर संस्थांची अचूक माहिती आणि सैन्याच्या अद्भूत अग्निशक्ति प्रदर्शनामुळे ऑपरेशन सिंदूर घडले. जेव्हा हे तिघे एकत्र आले, तेव्हा ऑपरेशन सिंदूर शक्य झाले.”



 

आपला देश अनेक दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करत आहे. गेल्या काही वर्षात पाकिस्तानने अनेक मोठ्या घटना घडवून आणल्या आहेत, पण त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले गेले नाही. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले आणि उरीमध्ये आपल्या सैनिकांवर पहिला मोठा हल्ला झाला, त्यांना जिवंत जाळण्यात आले आणि उरीनंतर लगेचच सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही पहिल्यांदाच दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये घुसून त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले, असं अमित शहा म्हणाले.

केंद्रीय मंत्री म्हणाले, “आम्हाला वाटले होते की आम्ही दहशतवाद्यांवर हल्ला केला आहे, परंतु पाकिस्तानने हे सिद्ध केले आहे की ते दहशतवादाला पाठिंबा देताय. पाकिस्तान दहशतवादावरील हल्ल्याला स्वतःवर हल्ला मानतो. जेव्हा पाकिस्तानी सैन्याने आमच्या नागरी स्थानांवर आणि आमच्या लष्करी आस्थापनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांच्या हवाई तळांवर हल्ला करून त्यांना आपली शक्ती दाखवली.”

Amit Shah said Pakistan considers attack on terrorists as an attack on itself

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात