विनायक ढेरे
नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यातल्या हाय प्रोफाईल गणेश दर्शना आधी त्यांनी बॉलिवूड मधला चित्रपट निर्माता रोहित शेट्टीला सह्याद्री अतिथीगृहात भेट दिली. या भेटीच्या फोटोचे ट्विट स्वतः अमित शहा यांच्या ट्विटर हँडल वरून करण्यात आले आहे. त्यामुळे या भेटीत नेमके काय शिजले?? याची चर्चा राजकीय वर्तुळाबरोबरच बॉलिवूडच्या वर्तुळात देखील सुरू झाली आहे. Amit Shah met Rohit Shetty before the high profile Ganesh Darshan
भेटीचे ट्विट अमित शहांच्या हँडल वरून
अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका निवडणुकीची जास्त चर्चा आहे. ते राज ठाकरे यांना भेटणार की अशोक चव्हाण यांना गळाला लावणार??, याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. मात्र माध्यमांच्या बातम्यांमध्ये रोहित शेट्टी अमित शहा यांची भेट घेईल असा उल्लेख नव्हता. सह्याद्री अतिथी गृहावर आज सकाळी रोहित शेट्टीने अमित शहा यांची भेट घेतली आहे आणि या भेटीच्या फोटोचे ट्विट स्वतः अमित शहा यांच्या ट्विटर हँडल वरून केल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Met noted director Rohit Shetty, today in Mumbai. pic.twitter.com/pfzPI2c3j6 — Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) September 5, 2022
Met noted director Rohit Shetty, today in Mumbai. pic.twitter.com/pfzPI2c3j6
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) September 5, 2022
साऊथचे सिनेमे जोरात बॉलिवूडचे कोमात
सुशांत सिंह राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर बॉलिवूड अधिकाधिक बदनाम झाले आहे. बड्या नेत्यांची मुले आणि बॉलीवूड यांच्यातले घातक संबंध उघडकीस आले आहेत. त्यातच मुंबईसह देशभरात दाक्षिणात्य चित्रपटांची धुमधडाक्यात सुपरहिट होत असताना बॉलीवूडचे सिनेमे मात्र धडाधड फ्लॉप होत आहेत. आमिर खानचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट लालसिंग चढ्ढा सिनेमा दणक्यात आदळला आहे. त्या पाठोपाठ बॉलिवूडच्या सगळ्याच निर्मात्यांना आपापल्या सिनेमांविषयी धास्ती तयार झाली आहे. प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याने तर खुद्द आमिर खानलाच सुपरहिट सिनेमा देण्याचा फॉर्मुला जमलेला नाही तर बाकी ज्यांची बातच सोडा!!, असे वक्तव्य करून बॉलिवूडला सध्या कसे चिंतेने ग्रासले आहे हे दाखवून दिले आहे. बॉलिवूडचा “अँटी हिंदू अटीट्युड” प्रेक्षकांना आता आवडेनासा झाला आहे. कधी उघडपणे, तर कधी चतुराईने “अँटी हिंदू अजेंडा” राबवण्याची बॉलीवूडची मस्ती आता सगळ्याच सिनेमा निर्मात्यांच्या अंगलट आली आहे!! त्यातही बॉलिवूडचे सिनेमा निर्माते, नट नट्या सिनेमा ऐवजी सिनेमा बाह्य गोष्टींवर जास्त सोशल मीडियावर कमेंट करत राहतात. त्यातूनही त्यांची वादग्रस्तता वाढली आहे आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून बॉलिवूडचे सिनेमे धडाधड कोसळताना दिसत आहेत. त्यामुळे बॉलिवूड मधले बरेच उंट आता पहाडाखाली यायला तयार झाले आहेत!!
एखाद दुसरा प्रोजेक्ट की आणखी काही??
या पार्श्वभूमीवर रोहित शेट्टीने अमित शहा यांची सह्याद्री अतिथिगृहात भेट घेतली का?? याविषयी उत्सुकता आहे. रोहित शेट्टीचा पुढचा प्रोजेक्ट काय असेल?? तो प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी अमित शहा यांची काय मदत होईल??, मूळात फक्त एखाद दुसऱ्या प्रोजेक्टसाठी अमित शहा हे रोहित शेट्टी ला भेट देतील का??, की त्यापेक्षा काही मोठा प्लॅन असेल?? या मुद्यावर बॉलिवूड सह राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पण एकंदरीत जी भेट माध्यमांच्या चर्चेत नव्हती, ती अमित शहा आणि रोहित शेट्टी यांची भेट सह्याद्री अतिथी गृहावर झाली आहे. या भेटीतून भविष्यात नेमके काय घडेल??, हे येणारा काळच सांगणार आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App